शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

तारापूरमध्ये सर्वात मोठा प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:56 PM

सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण; दुसरा टप्पाही लवकरच कार्यान्वित करणार

- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या विस्तारित सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) २५ एमएलडी क्षमतेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मंगळवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. उर्वरित २५ एमएलडीचा दुसरा टप्पाही लवकरच कार्यान्वित होणार असून जुना व नवा मिळून तारापूरच्या सीईटीपीची एकूण क्षमता ७५ एमएलडी होणार असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी देशातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ठरणार आहे.तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) या संस्थेने राज्यातील सर्वात मोठ्या तारापूर एमआयडीसीमध्ये सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून ५० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभरल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या सुरू असलेल्या २५ एमएलडी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सीईटीपी) या नव्या ५० एमएलडी सांडपाणी प्रक्रि या प्रकल्पाची जोड मिळणार असल्याने किमान जलप्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.तारापूर येथे सध्या कार्यान्वित असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता अवघी २५ एमएलडी असून त्याच्या क्षमतेच्या दुप्पट रासायनिक प्रदूषित सांडपाणी या प्रक्रि या केंद्रात येत असल्याने अनेक वेळा या प्रक्रि या केंद्रातून प्रक्रि या न करताच ते अतिरिक्त सांडपाणी सरळ नवापूरच्या खाडीत सोडले जात होते. त्यामुळे त्याचा गंभीर परिणाम नवापूरसह दांडी, नांदगाव, मुरबे इत्यादी खाडी किनाºयावर मासेमारीबरोबरच पर्यायाने मच्छिमार, तसेच शेती-बागायतीवर होत होता. यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली असून यासंदर्भात सुनावण्या सुरू आहेत, तर जमीन कंत्राट खर्चावरील आक्षेप इत्यादी अनेक अडथळ्यांमुळे या केंद्राच्या उभारणीस मर्यादेपेक्षा जास्त विलंब झाला. त्या सर्वावर मात करून हा प्रकल्प आता उभा राहिल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने एक समाधान देणारी बाब आहे.तारापूरच्या जलप्रदूषणाचा प्रश्न सुटणार : या कार्यक्रम प्रसंगी तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटीचे संचालक मंडळ प्रकाश पाटील, अशोक सराफ, डी.के. राऊत, सदाशिव शेट्टी, पवन पोद्दार, चरणप्रीत आहुजा, गुरुबक्ष सिंग, राजेंद्र गोळे व रामकी एन्व्हायर्नमेंट सर्व्हिसचे बॉबी कोरियन यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक व उद्योजकांचे प्रतिनिधी तसेच टीमाचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तारित ५० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यप्रणालीची माहिती समजून घेऊन पाहणी केली. या वेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित संचालक मंडळाच्या पदाधिकाºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात आलेल्या या केंद्राची प्रशंसा करून या केंद्रामुळे तारापूरच्या सांडपाण्याच्या प्रदूषणात निश्चित सुधारणा होईल, असे सांगितले.विस्तारित सीईटीपीची वैशिष्ट्येप्रकल्प क्षमता : ५० एमएलडीमे २०२० पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा संकल्पप्रकल्प किंमत : सुमारे रु. १२० कोटीउद्योजकांचा सहभाग : रु. १०८ कोटी(४८ कोटी प्रत्यक्ष+६० कोटी सारस्वत बँक कर्ज )अद्ययावत प्रक्रि या व्यवस्था१२.५ एमएलडी प्रक्रि या करणारे चार मॉड्युल्स (युनिट)प्रकल्पाला नीरी, आयआयटी (मुंबई), एमआयडीसी, एम.पी.सी.बी. यांच्याकडून मान्यताद्विस्तरीय डिफ्युज एअर फ्लोटेशन (डॅफ) तंत्रज्ञानाचा वापरअमोनियाकल नायट्रोजन निर्मूलनासाठी आॅनॉक्सिक प्रक्रिया पद्धत अंतर्भूतगाळा काढण्यासाठी द्विस्तरीय प्रक्रि या पद्धतजैविक व रासायनिक गाळ निर्मूलनाकरिता आवश्यक व्यवस्थाऊर्जा कार्यक्षम असणारी टर्बो ब्लोअर व्यवस्थासंगणकीकृत, आॅनलाइन देखरेख पद्धतीप्रकल्प परिसरात हरितपट्टा निर्माण होण्यासाठी २० हजार झाडांची लागवडविजेची गरज ४ हजार अश्वशक्तीअपेक्षित दरमहा प्रक्रि या खर्च : रु.१.५० कोटीअपेक्षित शासकीय (राज्य व केंद्र सरकार) अनुदान रु.४५ कोटीया केंद्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.