शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजपाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:04 AM

पालघर : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत ६ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला.

पालघर : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत ६ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला. यातील २ ग्रामपंचायतीत ग्रामविकास मंडळ तर १ ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडी ने बाजी मारली आहे.पालघर तालुक्यात उच्छेळी, सालवड, उनभाट, टेम्बिखोडावे, चटाळे, खिनवडे-गारगाव, लालोंडे, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे, मासवण अशा १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २६ डिसेंबर जाहीर झाल्या होत्या. यामधील खानिवडे-गारगाव, मासवण व लालोंडे ग्रामपंचायत सरपंच सदस्यांसह बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत ९ ग्रामपंचायतीचा निकाल बुधवारी पालघरच्या आर्यन हायस्कूलमध्ये जाहीर झाला. या ९ ग्रामपंचायतींपैकी सालवडमध्ये सरपंचपदासाठी विदुला विदूर पाटील विरु द्ध सुगंधा पाटील अशी सेना विरुद्ध सेना लढत होती तर शिरगावमध्ये सेनेचे जि. प. सदस्य घनश्याम मोरे यांच्या पत्नी चिन्मयी मोरे यांच्या समोर सरपंचपदासाठी भाजपाने मोठे आव्हान उभे केले होते.त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यामध्ये प्रतिष्ठित असलेल्या सालवड ग्रामपंचायत सरपंचपदी माजी पंचायत समिती सभापती विदुला विदूर पाटील यांनी सुमारे ६५० मतांनी बाजी मारली तर शिरगावमध्ये चिन्मयी मोरे यांनी भाजपच्या श्वेता पाटील यांचा सुमारे २२९ मतांनी पराभव करत भगवा फडकवला आहे.>चटाळे ग्रामपंचायत सरपंचपदी सेनेचे रवींद्र पाटील,उच्छेळी ग्रा.प च्या सरपंचपदी सेनेच्या मीनल भूतकडे, जलसार ग्रा.प च्या सरपंचपदी सेनेचे गणेश भोईर,कपासे ग्रा प सरपंचपदी सेनेच्या रेशमा भोईर तर उनभाट ग्रा प सरपंचपदी ग्रामविकास मंडळ पॅनलच्या सुनीता घोश्या, टेम्भिखोडावे ग्रापंच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीच्या रंजना पाटील तर लालठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बहुजन विकास आघाडीच्या सदानंद लाबड यांनी बाजी मारली.बिनविरोध झालेल्या ३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लालोंडे ग्रामपंचायत अदिती तांडेल, मासवण संजय पवार तर खिनवडे-गारगाव सुजाता दळवी यांनी आधीच बाजी मारली आहे.>सायदे आणि किनिस्ते भाजपाचेच; सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंगमोखाडा : तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या सायदे आणि किनिस्ते ग्रामपंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून अगदी पूर्वीपासून सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाºया याभागातील सेनेच्या वर्चस्वाला भाजपाने सुरुंग लावला आहे. भाजापाने दोन्ही ग्रामपंचायती वर सरपंचासह आपले सदस्यही बहुमतांनी निवडूून आणले आहेत. सायदे येथील सरपंच पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या दिलीप झुगरे हे ३९० मते मिळून विजयी झाले. सेनेच्या देवराम कामडी यांना ३७२ मते मिळाली. ११ सदस्यांच्या या निवडणूकीत अगोदरच भाजपाने २ जागा बिनविरोध मिळविल्या होत्या तर उर्वरित ६ पैकी ४ जागा जिंकून भाजपाने आपले वर्चस्व दाखवून दिले. किनिस्ते येथील सरपंचपदाच्या निवडणूकीत भाजपाच्या भारती शिंदे या ३२३ मते मिळवून विजयी झाल्या तर सेनेच्या सरपंचपदाच्या उमेदवार कविता मडके यांना ३०२ मते मिळाली या ग्रा.पं.च्या ४ जागा भाजपने बिनविरोध मिळविल्या. निवडणूकीत भाजपाने ३ पैकी २ जागा जिंकून ५ चे बहुमत मिळविले.>सायवनवर बविआचा झेंडा: बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांच्या गावी म्हणजेच सायवन ग्रामपंचायतीवर बविआचीच सत्ता आली असून खासदार पुत्र गणेश बळीराम जाधव हे थेट सरपंच निवडीत एकूण ७४२ मते मिळवून विजयी झाले त्यांनी परिवर्तन पॅनलच्या सागर टोपे यांचा ५०३ मतांनी पराभव केला. मात्र निकालानंतर वॉर्ड क्र मांक १ मधून अविनाश बसवत ३३८ मते विरु द्ध ११९ , शिल्पा माळी ३१० विरु द्ध ११४, अनिता गवारी ३२७ विरु द्ध १३० मते तर वॉर्ड क्र मांक २ मधून बाळकृष्ण २८९ विरु द्ध ११८, कामिनी उगळे २८२ विरु द्ध ६२ तर संजना जाधव २७८ विरु द्ध ७७ मतांनी निवडून आले. वॉर्ड तीन मध्ये परिवर्तनचे २ व अपक्ष १ उमेदवार निवडून आले आहेत.>तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची बाजी; सातपैकी चार ग्रामपंचायतीवर वर्चस्वतलासरी : तालुक्यातील सात पैकी चार ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने सरपंच निवडून आणून वर्चस्व प्रस्तापित केले तर तीन ग्रामपंचायतीत माकपचे सरपंच निवडून आले तर उधवा ग्रामपंचायत मध्ये माकपचे नऊ सदस्य निवडून आहे. परंतु सरपंच भाजप झाला उधवा मध्ये बंडखोरीचा फटका भाजपला बसला. उधवा, गिरगाव, घिमानिया या ग्रामपंचायतीवर भाजपा ची सत्ता होती पण या वेळी माकपाच्या ताब्यातील करजगाव ग्रामपंचायत भाजपने खेचली. तिथे सरपंच व सहा सदस्य निवडून आणले माकपाच्या करजगावच्या सत्तेला सुरुंग लावणारे भाजपचे लुईस काकड सहा सदस्यांसमवेत सरपंच झाले. उधवात माकपचे ९ सदस्य जिंकले. सरपंच भाजपचा झाला.माकपाला उपलाट , कवाडा, कुर्झे येथे यश मिळवून त्याचे सरपंच जिंकले. त्या माकपकडेच होत्या. यात भाजपने आपले सदस्य निवडून खाते उघडले. राजकारणी तलासरीतून मिरवणूक काढतात मात्र यावेळी पोलिसांनी आचार संहिता असल्याने मिरवणूक काढू नका असे सांगितले तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली तेंव्हा पोलिसांनी डीजे ताब्यात घेतला.>ग्रामपंचायत सरपंचउधवा सुरेश शिंदा (भाजप)गिरगाव गीता घोरखाना (भाजप)घिमानिया शीतल धोडी ( भाजप)करजगाव लुईस काकड (भाजप)कवाडा नंदा काटेला (माकप)कुर्झे मारिया वाडू (माकप)उपलाट गुलाब वाढीया (माकप)>अर्नाळयात भाजपा, किल्ल्यात बविआवसई : बहुजन विकास आघाडीची सत्ता उलथवून भाजपाने सरपंचपदासह अर्नाळा ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता काबिज केली. मात्र, अर्नाळा किल्ल्यात बंडखोरी झाल्याने भाजपाचा पराभव झाला. याठिकाणी बहुजन विकास आघाडीने सरपंचपद आणि तीन जागा जिंकल्यात. भाजपा आणि बंडखोरांचे सहा उमेदवार निवडून आले.वसई तालुक्यातील सर्वात मोठया अर्नाळा ग्रामपंचायतीत भाजपाने २१ जून २०१७ रोजीच परिवर्तन घडवून आणले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघे चार सदस्य असतांनाही भाजपाने दहा सदस्य असलेल्या बहुजन विकास आघाडीचा पराभव करून सरपंचपदावर जयमाला खारखंडी यांना निवडून आणले होते.त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने सतरा पैकी १५ जागा जिंकून बहुजन विकास आघाडीचा धुव्वा उडवला. दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदावर भाजपच्या हेमलता बाळशी निवडून आल्या. त्यांनी बविआच्या प्रियांका भुयाळ यांचा २ हजार २०० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बविआचा दारूण पराभव झाला. माजी सरपंच वैशाली भुरके, उपसरपंच सतीश तांडेल यांच्यासह बविआचे अनेक बडे उमेदवार पराभूत झाले.अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत मात्र बंडखोरीमुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली. याठिकाणी बहुजन विकास आघाडीचे चंद्रकांत मेहेर सरपंचपदी निवडून आले. मेहेर यांनी भाजपच्या हाती असलेल्या ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून सरपंच आणि उपसरपंचांना अपात्र ठरवण्याचे काम केले होते.त्याचा फायदा सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांना झाला. त्यातच याठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने मेहेर यांचा सरपंचपदी निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. बंडखोरीमुळे भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार गणेश वैती यांचा सव्वाशे मतांनी पराभव झाला. याठिकाणी बविआचे तीन सदस्य निवडून आले. भाजपा आणि बंडखोर भाजपाचे प्रत्येकी तीन-तीन सदस्य निवडून आले.>निवडणूक यंत्रणेचा अक्षम्य गोंधळबोर्डी / डहाणू : तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची मतमोजणी बुधवार, २७ डिसेंबर रोजी सेंट मेरीज हायस्कुल येथील केंद्रावर पार पडली. मात्र किन्हवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र मांक दोन मधील मतदान प्रक्रियेतील गोंधळामुळे केवळ तेरा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्याची नामुष्की ओढवली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डहाणूच्या सेंट मेरीज हायस्कूल येथे मतमोजणी केंद्रावर चौदा ग्रामपंचायतीत उमेदवार आणि ग्रामस्थानी गर्दी केली होती. डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. पहिल्यांदा बोर्डी ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला प्रारंभ आला. १७ पैकी ९ जागांसह सरपंचपदी प्रेरणा निलेश राठोड यांची दावेदारी भाजप पक्षाच्या वतीने सांगण्यात आली. जम्बुगावला भाजपने सत्ता स्थापन केली असून अन्य ग्रामपंचायतीत निम्म्यापेक्षा अधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. तर कापशी ग्रामपंचायतीवर बविआने तर सोगवेवर माकपने वर्चस्व मिळविले. राई, सावटे, वंकास, गंगणगाव, दापचरी, मोडगाव, कापशी, गोवणे, दाभोन आहणी आंबेसरी या ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे प्रक्रि येला गालबोट लागले. किन्हवलीतील प्रभाग २ ब मधील उमेदवार अरु णा लक्ष्मण कामडी यांचे नाव व चिन्ह ईव्हीएम मशीनवर नसल्याची बाब मॉक पोलच्या वेळी समजल्यानंतर आक्षेप नोंदविण्यात आला. साडेनऊ वाजेपर्यंत मतदान थांबविण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी जयेंद्र उबाळे यांच्याकडे आक्षेप नोंदविला गेला. तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन उमेदवारांच्या चिन्हाऐवजी अन्य निशाणी देण्यात आल्य होत्या. या वेळी तत्काळ बदल केल्याने मतदान सुरळीत झाले. बोर्र्डीच्या प्रभाग क्र मांक