हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने चार वेळा जिंकला असून भाजपाचा हा परंपरागत बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यापासून सुरू झालेले राजीनामा सत्र जिल्हाभर पसरले असून १२ मंडळ अध्यक्षासह १०० पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले आहेत.
मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी भाजपाला २५ जागा तर शिवसेनेने २३ जागा असे वाटप झाले असले तरी पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुठेही जाहीर करण्यात आलेले नव्हते. परंतु काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजप-शिवसेनेच्या चर्चेअंती पालघर लोकसभेची जागा सेनेला देण्यात आल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद विक्र मगड तालुक्यात उमटले जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प.स.सभापती मधुकर खुताडे आदींसह अनेक मुख्य पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांना पाठविले होते.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर काही अवधीतच शिवसेनेने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना शिवसेनेने शिवबंधन बांधून पालघर लोकसभेची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपा समोर आव्हान उभे केले होते. मात्र, यात वनगा यांना सहानुभूती पेक्षा भाजपाला मतांच्या रुपाने जनाधार मिळाला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या राजेंद्र गवितांना आपल्याकडे खेचून मुख्यमंत्र्यांनी एक तगडे आव्हान शिवसेने समोर उभे केले होते. अटीतटीच्या या लढाईत गावितांनी यश मिळविले होते. या टक्करीमुळे शिवसेनेने आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे घाव भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आजही विसरलेले नाहीत.एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात भाजपाचे विशेष अस्तित्व नसताना चिंतामण वनगांनी लोकांशी नाळ जोडून हा मतदार संघ भाजपमय केला. त्यामुळे १९८४ पासून भाजपा आतापर्यंत चार वेळा स्वबळावर निवडून आला असून आज जिल्ह्यात भाजपचा १ खासदार, २ आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, २१ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सभापती, ३६ पंचायत समिती सदस्य, २०० सरपंच, १२०० ग्रामपंचायत सदस्य, डहाणू नगरपालिका, ३६ नगरसेवक, एवढी मोठी ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीवर बांधलेला लोकसभेचा मतदार संघ श्रीनिवास वनगांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेला का म्हणून द्यायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी केला आहे.मतदारांना तोंड दाखवायचे कसे?च्खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर नेत श्रीनिवासला लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देत भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा डाव निवडणुकीतील पराभवामुळे फसल्याचे चित्र पुढे आले होते.च्मात्र, आता भाजपला कोंडीत पकडून भाजपची ही परंपरागत जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतल्याची बातमी आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाºयांना मतदारांना सामोरे जाणे मुश्कील होणार आहे.जिल्ह्यातून शेकडो पदाधिकाºयांनी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले असून अजूनही अनेक भागातून राजीनामे माझ्याकडे येत आहेत.- पास्कल धनारे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, पालघर.