शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

भाजपात ‘जुने विरुद्ध नवे’ वाद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:14 AM

भाजपच्या पालघर शहर अध्यक्ष तेजराज हजारी यांना हटवून त्यांच्या जागी अ‍ॅड. जयेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने ‘जुने विरुद्ध नवे’ आशा वादाला तोंड फुटली आहे.

- हितेन नाईक पालघर : भाजपच्या पालघर शहर अध्यक्ष तेजराज हजारी यांना हटवून त्यांच्या जागी अ‍ॅड. जयेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने ‘जुने विरुद्ध नवे’ आशा वादाला तोंड फुटली आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच भाजप मध्ये दोन गट निर्माण झाल्याने एका गटाने निवडणुका दरम्यान काम करणार नसल्याचे पत्र वरिष्ठांना पाठवले आहे.पालघर शहरात भाजपाची तशी विशेष ताकद नसल्याने कित्येक वर्षांपासून भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकलेला नाही. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना पालघर नगर परिषदेवरील सत्ता बदल करण्याची चांगली संधी भाजप कडे आहे. त्यातच अनेक पक्षाचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याची चांगली संधी भाजप सह विरोधकांकडे आहे. त्यामुळे भाजपसह अन्य विरोधी पक्षांची आघाडीचे संकेत मिळत असल्याच्या पाशर््वभूमीवर शहरात भाजपकडून जनमानसावर पकड असलेल्या व्यक्तीचा शोध लोकसभा पोटनिवडणुकी पासून सुरु होता. त्यातून जयेश आव्हाड यांची निवड करण्यात आली.नगर परिषदेची निवडणूक तोंडावर असून पदाधिकारी बदलाचा परिणाम होऊन काही कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता भाजपच्या पदाधिकाऱ्या कडून व्यक्त केली जात आहे. शहर भाजप अध्यक्ष हजारी यांच्या विरोधात तक्र ारी नसताना त्यांना शहर अध्यक्ष पदा वरून दूर करण्याचे कारण काय?असा प्रश्न भाजपच्या कार्यर्त्यांनी उपस्थित केला असून आम्ही नगरपालिका निवडणुकीचे काम करणार नसल्याचे कळविले आहे. परंतु तेज हजारी यांना हटविण्यात आले नसून त्यांना जिल्ह्याचे चिटणीस पद हे महत्वपूर्ण पद देण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांनी पत्रकारांना सांगितले.>माझी चिटणीस पदी निवड झाल्याचे कुठलेही पत्र मला मिळालेले नाही. अजूनही पालघर अध्यक्षपदाचा पदभार माझ्याकडेच आहे.मला पदावरून काढण्यात आल्यास त्याची कारणे मी प्रदेश कार्यालयात विचारणार.- तेजराज हजारी,माजी शहर अध्यक्ष