शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

चाळींसाठी नाला गायब

By admin | Published: May 31, 2016 3:01 AM

तुंगारेश्वर पर्वतावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेला शंभर फुटी नालाच भूमाफियांनी गायब केल्याचा प्रकार उजेडात आला आहे

वसई : तुंगारेश्वर पर्वतावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेला शंभर फुटी नालाच भूमाफियांनी गायब केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याठिकाणी असलेल्या आदिवासी जमिनींवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर बेकादा चाळी बांधत असलेल भूमाफियांनीच हा नाला गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याची महापालिकेने चौकशी सुरु केली असून अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. वसई फाटा येथील मनीचापाडा रिचर्ड कंम्पाऊंड येथे हा नाला होता. अनाधिकृत बांधकामांना तो अडथळा ठरत असल्याने तो ९० फूट बुजवून केवळ १० फुटी कृत्रिम नाला बांधण्यात आला आहे. आजूबाजूचा पूर्ण परिसर हा डोंगराने व्यापलेला आहे. पावसाळ्यात याच डोंगराचे पाणी या नाल्यातून संमुद्राला मिळत होते. परंतु शंभरफ़ुटी नैसर्गीक नालाच भूमाफ़ियांनी बुजवल्याने पावसाळ्यात येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गा नजीक वसई फाटा जवळ रिचर्ड कंम्पाऊंड मधील मणीचा पाडा ते जबारपाडा हा परिसर पूर्णपणे भूमाफियांनी व्यापला आहे. मौजे पेल्हार मनीचा पाडा सर्व्हे नं. ९६ ही जमीन मिळकत अदिवासी शेतकऱ्यांची आहे. पेल्हार डॅम ते रिचर्ड कंम्पाऊंड पर्यंत शंभर फ़ुटी नैसर्गीक नाला होता. परंतु या परिसरात चाळ माफियांनी अतिक्रमण करुन हा नैसर्गिक नाला माती, रॅबीट आणी दगड टाकून बुजवला आहे. नैसर्गिक नाला कळु नये यासाठी भूमाफियांनी बाजुलाच सिमेंटचा दहा फुटी नालाही बांधला आहे. या परिसराच्या बाजुला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. येथील डोंगराचे पाणीही याच नाल्यातून वसई मार्गे समुद्राला मिळत होते. शंभर फ़ुटी नाला बुजल्याने पेल्हार, मणीचापाडा, रिचर्ड कंम्पाऊंड, जबारपाडा, वसई फ़ाटा, यासह अन्य परिसराला पुराचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आजूबाजूची शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसानही होण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)