पालघर : ओएनजीसीच्या समुद्रातील सर्वेक्षणाच्या गार्ड बोटीने सातपाटी मधील ‘दिव्य लक्ष्मी’ या मच्छीमार बोटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोटीतील २-३ खलाशी समुद्रात फेकले गेले. तर, १३ खलाशांचे प्राण वाचले असून बोटीचे मोठे नुकसान झाले. सातपाटी येथील पंकज म्हात्रे यांच्या मालकीची ‘दिव्य लक्ष्मी’ ही बोट सोमवारी दुपारी १ वाजता मासेमारी साठी रवाना झाली. ही बोट समुद्रात १० नॉटिकल मैलावर पोहोचली. त्यावेळी समोरून एमएसव्ही-श्रद्धा सागर हे मोठे जहाज वेगाने येत असल्याचे बोटीचे चालक राजू पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी खलाशी कामगारांना बाहेर पाठवून झेंड्या द्वारे जहाजाला बाजूने नेण्याचे इशारे केले. मात्र वेगाने आलेल्या त्या जहाजाने ‘दिव्य लक्ष्मी ला मधोमध जोरदार धडक दिली.
गार्ड बोटीच्या धडकेने मच्छीमार बोट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:26 AM