पालघर : प्रेरणा महिला बचत गट काटकर पाडा बोईसर येथील रास्तभाव धान्य दुकानातील धान्याचा अपहार केल्या प्रकरणी बोईसर पोलिस स्टेशन मध्ये अध्यक्ष प्रेरणा काटकर आणि सचिव यांच्या विरोधात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या दुकानातील धान्य हे काळयाबाजारात विक्र ी केले जात असल्याच्या माहितीवरुन तहसीलदार डॉ. स्नेहल कनीचे, पुरवठा अधिकारी संभाजी पावरा,मंडल अधिकारी संदीप म्हात्रे इ.नी अचानक भेट देवून रजिस्टर व प्रत्यक्षात साठा तपासला असता त्यात तफावत आढळून आली. त्यामध्ये शिल्लक साठयामध्ये ८५ किलो तांदूळ कमी तर २२.५२ क्विंटल गव्हाचा जास्त साठा आढळून आला. तपासात प्रेरणा काटकर आणि सचिव प्रीती लर्डे यांनी धान्याचा अपहार करून त्याची काळया बाजारात विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बोगस पावत्या बनवून ते विक्री केल्याचे दाखविले, असे निदर्शनास आले. त्यामुळे पुरवठा अधिकारी पावरा यांच्या तक्रारीवरुन अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती पावरा यानी दिली. (प्रतिनिधि)
रेशन दुकानदाराविरुद्ध बोईसरला गुन्हा दाखल
By admin | Published: June 15, 2016 12:40 AM