शहरं
Join us  
Trending Stories
1
Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
3
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
4
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
5
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
6
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
7
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
8
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
9
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
10
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
11
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
12
Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया
13
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
14
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
16
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
17
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
18
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
19
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
20
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

बोईसर पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने गणेश भक्तांना वाचविले, अतिवृष्टीमुळे भरला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 6:14 AM

पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले.

बोईसर : पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले. यावेळी अनेकांनी स्वत: पुढे होत जीव धोक्यात घालून बचाव कार्य केले.मंगळवारी सायंकाळनंतर धुवांधार पावसामुळे बोईसरसह पूर्वेकडील, खैरेपाडा व बेटेगाव रस्ता जलमय झाला. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गणेश कुंडाकडे वाजत गाजत कूच करीत असतानाच अतिवृष्टीमुळे नाला दुथडी भरून वाहू लागला.गणेश कुंडा जवळ काही गणेश भक्त व काही दूध वाले पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची खबर बेटेगाव येथील नवतरु ण क्र ीडा मंडलाचे अध्यक्ष संदीप घरत व त्यांच्या सहकाºयांचा मिळताच त्यांनी प्रचंड धोका पत्करून दोराच्या सहायाने पुराच्या पाण्यात उतरून सर्वाना सुखरूप बाहेर काढले. तर खैरापाडा येथील राऊळ पेट्रोल पंप आवारा भोवती सुमारे पाच फुट उंच पाणी प्रचंड वेगाने वाहत होते तेथे सुमारे १२०० गणेश भक्त अडकले होते. त्या मध्ये वयोवृद्ध व्यक्ती, स्त्रीया, लहान मुले यांचा समावेश होता. ही खबर मिळताच बोईसरचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिसंग पाटील हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान. पालघर तहसिलदार महेश सागर यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्याशी संपर्क साधुन या आपत्कालिन परिस्थितीमध्ये मदत करावी अशा सुचना दिल्या.१२०० भक्त सुखरुपनिरोप मिळताच राऊळ यांनी तातडीने आपल्या सहकार्यांना घेऊन दोर, ट्युब व इतर साहीत्य घेऊन घटनास्थळी पोहोचुन पोलीसांच्या समवेत धोका पत्करून बचाव कार्याला सुरूवात केली. प्रथम शेरू नामक ट्रक ड्रायव्हरला पाण्याच्या बाहेर काढले. तब्बल १२०० भक्तांना बाहेर काढले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव