पंकज राऊतबोईसर : पालघर तालुक्याच्या बोईसर व तारापूर परिसरातील जिल्हा परिषदेच्या ८ गणात व पंचायत समितीच्या १६ गटात काही ठिकाणी सरळ, काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढतीचा सामना होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ८ गणात एकूण २७ तर पंचायत समितीच्या १६ गटात एकूण ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब अजमावत आहेत. सरावली गटातून शिवसेनेच्या वैभवी राऊत या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.जि.प.च्या बोईसर काटकर पाडा गणांमध्ये ६ उमेदवार उभे आहेत तर तारापूर व शिगाव खुताड येथे ४, दांडी, पास्थळ व खैरेपाडा येथे ३ तर बोईसर वंजारवाडा व सरावली येथे २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये प्रकाश निकम, चेतन धोडी, भावना विचारे हे विद्यमान जि.प.सदस्य तर करुणा पाटील व वैदही वाढाण या माजी जि.प.सदस्य निवडणूक आखाड्यामध्ये आहेत.पंचायत समितीच्या दांडी गटामध्ये सर्वात जास्त ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर तारापूर, कुरगाव, पास्थळ, काटकर पाडा, बोईसर ,बोईसर वंजार वाडा, सरावली अवधनगर, उमरोळी व शिगाव येथे प्रत्येक गणात ३ उमेदवार उभे आहेत. खैरापाडा ५ तर नवापूरला ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रत्येक गटांमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे. यामध्ये पालघर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती मनीषा पिंपळे, विद्यमान उपसभापती मेघन पाटील हे अपक्ष तर विद्यमान पं.स.सदस्य मुकेश पाटील व विद्यमान जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे हे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड रंगत निर्माण झाली असून काही ठिकाणी काँटे की टक्कर होणार आहे.>वाड्यात प्रशासन सज्जवाडा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक उद्या होत असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास निवडणूक कर्मचारी मतदान पेट्या घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले. पां.जा.विद्यालयाच्या प्रांगणातून मतदान साहित्य कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट असून पंचायत समितीचे बारा गण आहेत. तालुक्यात १५२ मतदान केंद्रे असून यासाठी एक हजार ८० कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांनी नियोजन पध्दतीने मतदान साहित्याचे वाटप केले.वाडा आगारातून १९ बस निवडणूक साहित्य वाटपाकामी गेल्या आहेत. तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी आपल्या कर्मचाऱ्यांसह लक्ष ठेवून आहेत.>अधिकारी, कर्मचाºयांना दोन तासांची सूटपालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाºया आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या दिवशी सरकारी व निमसरकारी कार्यालये सुरू राहतील. तथापी जे अधिकारी व कर्मचारी हे या कार्यक्षेत्रातील मतदार आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले आहेत.>बविआ-शिवसेना-श्रमजीवीत महामुकाबलापारोळ : यंदा वसई पंचायत समिती अंतर्गत ७ गणांसाठी आणि पालघर जिल्हा परिषद अंतर्गत ३ गटांसाठी उद्या मतदान होत आहे. ग्रामीण भागात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद असली तरी यावेळेला पत्ता कापलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी असल्याने एक दोन जागांवर बविआला फटका बसण्याची दाट चिन्हे आहेत. वसई पंचायत समितीच्या कळंब गणाची व जिल्हा परिषद कळंब गटाची निवडणूक बिनविरोध झाल्याने आता ३ गट आणि ७ गणांसाठी मतदान होणार आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडी-शिवसेना-श्रमजीवी संघटना आणि भाजपमध्ये महामुकाबला रंगणार आहे.>मतदारांना सुटी किंवा सवलत द्यापालघर : पालघर जिल्हा परिषद गटाची व गणाची निवडणूक उद्या होत असून या निवडणुकीसाठी मतदारांना सुटी अथवा दोन ते तीन तासांची सवलत देण्याचे आदेश कामगार उपायुक्त कि.वि.दहिफळकर यांनी काढले आहेत.मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात कामगार अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त निवडणूक होणाºया क्षेत्रावर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारी सुटी देण्यात यावी, तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी सुटी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. संबंधित आणि जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे त्यासाठी आवश्यक राहील.कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी दोन ते तीन तासाची सवलत देणे बंधनकारक राहणार आहे. मतदारांना मतदान एकर मतदानासाठी योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्यास त्याबाबत तक्र ार आल्यास त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश दहिफळकर यांनी दिले आहेत.
बोईसर-तारापूरला चुरस, उमेदवारी देण्यावरून सेनेतही नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:16 AM