- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर: प्रस्तावित वाढवणं बंदराला स्थानिकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) आता आडमार्गाने आपले हे बंदर साकारण्याची शक्कल लढवल्याचे शुक्र वारी येथे आयोजित कार्यक्र मातून दिसून आले आहे. या कार्यक्र मावर शिवसेनेने बहिष्कार टाकला असून वाढवणं विरोधी संघर्ष समितीही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहे.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या नावाने एक निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरून सध्या सर्वत्र फिरत असून त्यात ‘सबका साथ, सबका विकास संमेलन’ असे शीर्षक देऊन ते कै. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह नवली, पालघर पूर्व येथे होणार असल्याचे म्हटले आहे. या निमंत्रण पत्रिकेवर डाव्या बाजूला केंद्रीय नौकायन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असून या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री विष्णू सवरा, सन्मानीय पाहुणे म्हणून खासदार चिंतामण वनगा व विशेष पाहुणे म्हणून आमदार विलास तरे, आ.क्षितिज ठाकूर, आ.हितेंद्र ठाकूर, आ.पास्कल धनारे, आ.आनंद ठाकूर, आ.अमित घोडा व जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांची नावे नमूद केली आहेत.वाढवणं बंदराला हरित प्राधिकरणाने स्थगिती दिल्या नंतर हे प्राधिकरणचं रद्द करण्याचा कुटील डाव भाजपा सरकार ने आखला असून तशा हालचालीही सुरु झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते.कुठल्याही परिस्थितीत वाढवणं बंदर उभारण्याचा सरकारचा अट्टाहास सुरु असून समाजातील शेवटच्या घटकांचा विकास साधण्याची ग्वाही देणारे हे सरकार सर्वसामान्यांनांवर हे बंदर लादण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्या बंदराला विरोध करणाऱ््या संघटनातील काहींना फितूर करण्याचे षडयंत्र आता सर्वसामान्यांच्या लक्षात आले असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे नेहरू पोर्ट ट्रस्टने छुप्या पद्धतीने विविध कार्यक्र म, विकास कामाच्या आड हे वाढवणं बंदर तुमच्या साठी कसे फायदेशीर असल्याचे पटवून देण्याचा अट्टाहास करीत आहे. निमंत्रण पत्रिकेवरून कार्यक्र माचे स्वरूप स्पष्ट होत नसले तरी पोर्ट ट्रस्टने वाढवणं बंदरासाठी जिल्ह्यात छुपा प्रवेश करण्याकरिता हा कार्यक्र म आयोजित केल्याची भावना स्थानिक मच्छीमार, शेतकरी, डायमेकर यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. देशाच्या विकासाच्या नावावर अणुऊर्जा प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणारे स्थानिक शेतकरी, मच्छिमारांची फसगत झाल्याने स्थानिक सजग झाला आहे. लोकांनी आता राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीवर बारीक लक्ष ठेवले असून ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’ अशी भूमिका घेणाऱ्याला त्याची जागा दाखवून देण्याचीभावना व्यक्त होत आहे.निमंत्रण पत्रिकेत नाव माझ्या संमतीविनामाझी संमती न घेता पत्रिकेवर माझे नाव छापले असून जेएनपीटी आयोजित या कार्यक्र मावर बहिष्कार टाकला आहे असे आमदार अमित घोडा यांनी तसेच शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख व नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनीही लोकमतशी बोलतांना गुरूवारी सांगितले.गुरुवारच्या बैठकीत विरोधाचे नियोजनवाढवणं विरोधी समिती व मच्छीमार कृती समितीची बैठक होऊन या कार्यक्र मा दरम्यान काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील, अशोक अंभिरे, वैभव वझे, पाटील, मच्छीमार कृती समिती अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.बहुजन विकास आघाडीचा पूर्वीपासून वाढवणं बंदराला विरोध असून आम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या सोबत आहोत या कार्यक्र माची कोणतीही निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यामुळे त्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.विलास तरे, आमदार, बहुजन विकास आघाडीजर जेएनपीटी छुप्या पद्धतीने ते उभारण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला वाढवणं बंदर विरोधी संघर्ष समिती विरोध करेल. तसेच कार्यक्र मादरम्यान काळे झेंडे दाखवू. - नारायण पाटील, अध्यक्ष वाढवणं विरोधी संघर्ष समिती. ह्या कार्यक्र मा बाबत विचारणा करून सांगतो.मी सध्या मिटिंग मध्ये असून ह्या कार्यक्र मा दरम्यान मी मुंबईत असल्याने मला उपस्थित राहता येणार नाही. -आ. पास्कल धनारे, भाजपा