नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेकडून गटारे बंदिस्त करण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला असून आय.आय.टी. मुंबईच्या निर्देशानंतर गटारांचे बांधकाम तर होईल मात्र ती बंदिस्त करता येणार नाहीत. दरम्यान, आतापर्यंत मात्र महापालिकेचा भुयारी गटारांवर ७५.८४ कोटी खर्च केल्याचे माहितीची आधिकारातून उघड झाले आहे. मात्र, हा बहुतांश खर्च विरार पूर्व व पश्चिम भागात केला आहे.
वसई विरार महापालिकेने पालिका क्षेत्रात तब्बल ६१.४४ कि.मी.लांबीची गटारे बंदिस्त केली आहेत. मात्र शहरी भागातील अनेक ठिकाणी उघड्या नाल्यांमूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिकेकडे आता निधी उपलब्ध नाही तर पुरपरिस्थितीनंतर सत्यशोधन समितीच्या आय आय टी संस्थेने नाले बंदिस्त करू नका असे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरी वसाहतीतून जाणारे सांडपाण्याच्या नाले व गटारे उघडी असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
महापालिकेने शहरात बंदिस्त गटारे बांधली आहेत. त्यावर तब्बल ७५.८४ कोटी रूपये खर्च केला आहे. मात्र, हा खर्च विरार पूर्व व पश्चिम भागातच केला गेला असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा, वसई शहरी भागातील गटारे अजूनही उघडीच असल्यामुळे नागरीकामध्ये संतापाचे वातावरण आहे. वसई पूर्व वसंत नगरी वसाहत सेक्टर १ ते ४ मध्ये वसलेली आहे. या सेक्टरला लागून नाला जातो. मात्र विकासकाने हा नाला बंद न करता परिसरात वसाहती उभ्या केल्या. आता या उघड्या नाल्यांचा त्रास रहिवाशांना होत आहे. दुर्गंधीसोबत डासांचा उपद्रव वाढलेला आहे. महापालिकेचे आरोग्य खातेही उदासिन असल्यामुळे डासप्रतिबंधक फवारणी केली जात नाही. त्यामुळे या परिसरात नेहमी डेंग्यू, मलेरियाची लागण होत असते.
नाला बंदिस्त करण्यासाठी पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक होशियार सिंह दसोनी यांनी केला आहे. त्यांनीच शहरात भुयारी मार्गावर कुठे आणि किती खर्च केला आहे याची माहिती मागवली होती.नागरिक त्रस्त, प्रशासन मस्तवसंत नगरीजवळील हा नाला बांधण्यात येऊन तो बंदिस्त करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे. दोन महिन्यापूर्वी महापौर जाधव पाहणीसाठी आले होते. त्यावेळी लवकरच या नाल्याचे काम हाती घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रभारी सहाय्यक आयुक्त तळेकर यांनी याबाबत बांधकाम अधिकारी राजेंद्र लाड यांच्याशी संपर्क साधा म्हणत हात झटकले. लाड यांनी ‘ड’ विभाग अभियंता प्रकाश साटम यांच्याशी संपर्कसाधूनमाहिती घेण्यास सांगितले. एकाही अधिकाऱ्याला याबाबत माहिती नसल्याचे या गोष्टीवरून समोर आले आहे.पालिका क्षेत्रात भुयारी गटारे कुठे व किती?वसई विरार शहर महानगरपालिकेने आतापर्यंत भुयारी गटारे मुख्य वाहिनी सुमारे ६१.४४ कि.मी.बांधली आहेत. त्यात प्रॉपट्री कनेक्शन १४.५३ कि.मी. आहे.हि गटारे विरार पूर्व, जीवदानी मंदिर रोड, सहकार नगर, गावड वाडी, स्टेशन रोड, फूलपाडा, मनवेल पाडा, कारगील नगर, गुरूदत्त नगर,विरार पश्चिम, विराट नगर,गावठाण स्टेशन रोड, एम.बी.इस्टेट, विवा कॉलेज रोड, वाय के नगर,युनिटेक, तिरूपती नगर, गोकुळ टाऊनशीप व सुंदर नगर याठिकाणी कामे करण्यात आली आहेत.यावर पालिकेने ७५.८४ कोटी खर्च केला आहे.
दोन महिन्यापूर्वी महापौर रूपेश जाधव पालिका अधिका-यांना नाल्याच्या पाहणीसाठी घेऊन आले होते. लवकरच नाल्याचे काम सुरू करू असे त्यांनी सांगितले होते. मात्र अजूनही याबाबत पालीकेकडून हालचाल सुरू झालेली नाही.- होशियार सिंह दसोनी,वसंत नगरी स्थानिक नागरीकपालिकेकडे निधीची कमतरता आहे. जुलै महिन्यातील पूरानंतर आयआयटी संस्थेने मोठे नाले बंदिस्त करू नका असे निर्देश दिले आहेत. हा नाला बांधण्यात येईल मात्र तो बंदिस्त करता येणार नाही.- निलेश देशमुख,सभापती, वसई विरार महानगरपालिकावसंत नगरीजवळील उघडा नाला बांधण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यावर मंजुरी मिळाल्यावर तसेच निधी उपलब्ध झाल्यावर लगेच नाला बांधण्यात सुरूवात होईल. मात्र हा नाला बंदिस्त नसेल.- प्रकाश साटम, अभियंता (‘ड’ विभाग)