वसई, दि.६ (लोकमत न्यूज नेटवर्क) - सोपारा येथील पुरातन आणि आंततराष्ट्रीय महत्व असलेल्या बौध्द स्तूपातील तसेच वसईच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वसई किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्राचा विकास करावा तसेच येथे येणाºया पर्यटकांसाठी सोई सुविधा उपलब्ध करु न द्याव्यात याकरिता पर्यटन मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल व सचिव डॉ.उ षा शर्मा, यांचे कडे महापौर रु पेश जाधव यांनी निवेदन दिले असून पुरातत्व खात्याने पालिकेला या दोन्ही स्थळांच्या विकासाचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिली आहेत.नालासोपारा येथील सोपारा गावात असलेला बौध्द स्तूप अडीच हजार वर्ष जुना असून तो सांची स्तूपाची प्रतिकृती आहे. हा स्तूप बौध्द धम्माच्या जगातील प्रसाराचे एक प्रमुख केंद्र होते. आताचे सोपारा हे तेव्हाचे शुर्पारक शहर असून ते पुर्वी कोकण प्रांताची राजधानीचे शहर होते. या बुद्धविहारची स्थापना भगवान गौतम बुदधांनी केली होती असे म्हटले जाते. मात्र, या स्तूपाची दुरवस्था झालेली आहे. बौद्ध स्तुपाला हजारो पर्यटक, बौद्ध भिक्खू, अनुयायी भेट देत असतात. मात्र तिथे प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने त्यांची गैरसोय होत असते. स्तुपाच्या परिसरात बसण्यासाठी बाकेही नाहीत. त्यामुळे इथे येणारे बौद्ध भिक्खू आपल्यासोबत तंबू घेऊन येतात. स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत. पाण्याची आणि प्रसाधनगृहाची देखील व्यवस्था नव्हती. हा स्तूप पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत असल्याने वसई-विरार महापालिकेला काही करता येत नव्हते.विकासाचा आराखडा सादर करा!याबाबत वसई विरार महापालिकेने महापौर रु पेश जाधव यांनी डिसेंबर महिन्यात पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली होती. तर मंगळवारी दिल्ली पर्यटन मंत्रालयाच्या सचिव डॉ. उषा शर्मा यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. बौध्द स्तूप आणि वसई किल्ल्यातील गैरसोयी दूर करून सोयीसुविधा देण्याची पालिकेची तयारी असल्याचे सांगितले. त्यावर पर्यटन खात्याने पालिकेला दोन्हा ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचा आराखडा काय असेल त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.महापौर जाधव यांनी दिलेले निवेदन : महापौरांनी सादर केलेल्या निवेदनात एतिहासीक वारसा असलेल्या वसई किल्ला व सोपारा बुद्धस्तुपाचे संवर्धन करावे, वसईचा इतिहास येणाºया पर्यटकांपर्यत पोहचणेसाठी म्युझअिम, मिनी थेटर, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, राहण्यासाठी सुविधा, सुरक्षा रक्षक, माहिती फलक, विद्युत व्यवस्था अशा प्रमुख मागण्या यावेळी डॉ. उषा शर्मा यांचे कडे करण्यात आल्या. शर्मा यांनी सदर दोन्ही एतिहासिक स्थळांचा प्रकल्प अहवाल तात्काळ महापालिकेने तयार करु न पर्यटन मंत्रालय यांचे कडे सादर करण्यांस संबंधीतांस आदेशीत केले. लवकरच या दोन ठिकाणी सोई सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन व्यवसाय वाढून येथील स्थानिकांना रोजगार मिळण्यास नक्कीच मदत होईल.
बौद्ध स्तूप अन् किल्ल्याला अच्छे दिन , महापौरांनी घेतली केंद्रीय पर्यटन सचिवांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:28 AM