वसई : २०१ कोटी रुपयांची शिल्लक असलेला वसई विरार महापालिकेचा १ हजार ८६७ कोटी ३५ लाखाचा सातवा अर्थसंकल्प स्थायी समितीने विशेष महासभेत सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या मालमत्ता कर वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी यावर चर्चा होऊन अर्थसंकल्पाला मंजूरी घेण्यात येणार आहे.स्थायी समितीचे सभापती अफीफ शेख यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर करून त्याचे वाचन केले. त्यानंतर या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी सात दिवसांची मुदत मागितली. महापौर रुपेश जाधव यांनी येत्या शुक्रवारी विशेष महासभेत त्यावर चर्चा करून मंजूरी घेण्यात येईल, असे जाहिर केले.मालमत्ता कर, अनधिकृत बांधकामावरील मालमत्ता करावर शास्ती, नगररचना विभागाची फी, जाहिरात फी, जागेचे भाडे ही महापालिकेचे उत्तन्नाचे मार्ग आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीवर यंदाच्या बजेटमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरातील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण करून नव्याने क्षेत्रफळानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. तर अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर शास्ती लावली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ता करात वाढ होऊन महापालिकेच्या तिजोरीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर अनधिकृत नळ जोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही अर्थसंकल्पात सुचवण्यात आले आहे.एमएमआरडीएच्या नव्या योजनेतून १८५ एमएलडी पाण्यासह देहरजा आणि सुसरी प्रकल्पातून ४९० एमएलडी मिळून एकूण ६७५ एलएलडी पाणी आगामी काळात वसईकरांना मिळणार असल्याची ग्वाही अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. विरार शहरातील पूर्वेला नारंगी येथील टेकडीवर हँगिंग गार्डनच्या धर्तीनर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. नालासोपाऱ्यातलक्ष्मीबेन छेडा मार्ग, मजेठीया पार्क येथे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तर विरार शहरात गोकुळ टाऊनशिप परिसरातील सांस्कृतिक भवनाचे कामही अंतिम टप्यात असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक सेवेसाठी उड्डाणपूल अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावितवसई विरार शहरातील वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी माणिकपूर शहरातील पंचवटी नाका, नालासोपाºयातील आचोळे चंदननाका, नालासोपारा लक्ष्मीबेन छेडा मार्ग, श्रीप्रस्थ, सेंट्रल पार्क, विरार शहरातील नारंगी नाका, बोळींज, फुलपाडा येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विरार शहरात नारंगी, विराटनगर, नालासोपाºयात ओसवाल नगरी, अलकापुरी, नवघर-माणिकपूर शहरात उमेळमान या ठिकाणी रेल्वेच्या दोन्ही बाजूंना जोडणारे रेल्वे उड्डाणपूल अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१,८६७ कोटींचा अर्थसंकल्प; अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून शास्ती लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:47 AM