पालघर : महामार्गावर बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या वाहन चालकांवर नियंत्रण आणून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेत तीन अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. या वाहनातील लेझरस्पीड गन, टिंट मीटर आणि ब्रेथ अॅनॅलायझरच्या माध्यमातून वाहनांवर करडी नजर ठेवली जात असून आतापर्यंत १२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांमध्ये अलीकडे वाढ होत असून प्रवाशांचा या अपघातादरम्यान मृत्यू ओढवतो. बेदरकार तसेच सुसाट वाहनांमुळे होणाºया अपघातांमधील मृतांचा वयोगट हा प्रामुख्याने १७ ते ४५ असा असतो. ऐन तारुण्यात ओढवणाºया या मृत्यूमुळे अनेक कुटुंबे दु:खाच्या खाईत लोटली जात असल्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने हे नियंत्रण आणि जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेप्टर वाहन पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील मनोर, चारोटी आणि चिंचोटी येथे ही वाहने सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कार्यरत राहणार आहेत. मोठ्या अवजड वाहनाने ६० किमी. प्रतितास वेगाने आपली वाहने तिसºया लेनमधून चालवायची आहेत. त्यांनी आपली लेन सोडून वाहने चालविल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे तर गाड्या ८० कि.मी. प्रति तास व मोटारसायकल ६० कि.मी. वेगाने जाणार असून वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई होणार असल्याचे उपनिरीक्षक एन.एस.चौगुले यांनी सांगितले. अशी तीन वाहने जिल्हा वाहतूक शाखेत दाखल झाली आहेत.या वाहनात लेझरस्पीड गन असून त्याद्वारे वाहनांचा वेग मोजता येणार आहे. सदर लेझरस्पीड गनचा वापर करून आणि त्यातील कॅमºयाच्याद्वारे वेग ठरविणे शक्य होणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाºया वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल. त्यासाठी वाहन मालकाच्या मोबाइलवर तत्काळ संदेश जाईल. सदर यंत्रणा इंटरनेटद्वारे कार्यान्वित राहणार आहे. यासोबतच या वाहनात टिंट मीटर उपलब्ध आहे. काचांवरील काळ्या रंगाच्या फिल्मची तपासणी याद्वारे केली जाईल. काळ्या रंगाची फिल्म ८० टिंटपेक्षा अधिक असता कामा नये, काळी फिल्म सदोष असल्याचे या उपकरणाद्वारे आढळून आल्यास दंड होऊ शकतो. मोटरवाहन कायद्यानुसार लेन कटिंग २०० रुपये, वेग मर्यादा उल्लंघन १ हजार तर काळ्या काचेसाठी २ हजार दंड आकारणी करण्यात येणार आहे. यात ब्रेथ अॅनालायझर उपकरण राहणार असून मद्यप्राशन करणाºया वाहन चालकाची तत्काळ तपासणी केली जाईल. सदर उपकरणाद्वारे वेळीच प्रिंट काढून माहिती प्राप्त होणार आहे.
१२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 4:09 AM