पारोळ : दिवाळीचा सण जवळ आल्याने वसई, विरार, नालासोपारा, परिसरातील बाजार पेठा साहित्याने फुलल्या असून दिवाळीच्या अधीचा रविवार आल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदी साठी मोठी गर्दी केली होती.सणाची खरेदी हा, जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम असते. दिवाळीच्या निमित्ताने कपडयÞांपासून चीजवस्तूंपर्यंत, धान्यापासून मिठायांपर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते. याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोषणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो. राहिलंच तर दिवाळसणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फिर्नचर, गाडी यांच्या खरेदीचेही बेत आखले जातात. गेल्या काही वर्षांत रूजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळी निमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. त्यात आता आॅनलाइन शॉपिंगची नवलाई अवतरली आहे. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा अशी व्हर्च्युअल खरेदी स्वस्त असल्याने स्मार्ट ग्राहक आता हा पर्याय निवडू लागले आहेत. विशेषत: तरूणवर्ग त्यास पसंती देत आहे.बाजाराचा नवा कलदिवाळी अधिक देखणी करण्यासाठी आकाशकंदील, पणत्या, दिवे, तोरण आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, तोरण, रांगोळीचे स्टीकर बाजारात उपलब्ध झाले आहेत.रांगोळी अधिक सोयीस्करयंदा पांढरी रांगोळी दहा रुपये किलो, तर रंगीत रांगोळी २५ ते ४० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध १४ प्रकारच्या रंगांमध्ये रांगोळी असल्याने त्यातील गुलाबी, लाल, पोपटी, भगव्या, हिरव्या रंगाच्या रांगोळीला अधिक मागणी आहे.मेणाच्या पणत्यांचा पर्यायदिवाळीत खरे तर परंपरेने तेलाच्या पणत्या लावण्याची प्रथा असते. आता वापरायला सोप्या मेणाच्या दिव्यांनी त्यांची जागा घेतली आहे. मोठ्या रांगोळ्यांमध्ये सजवायला आणि दीपोत्सवांमध्ये हमखास असे मेणाचे दिवे दिसतात.आॅनलाइन बाजारातही तेजीआॅनलाइन शॉपिंग संकेतस्थळांवरून मिळणारी आकर्षक सूट आणि असंख्य प्रकारचे पर्याय यांमुळे आॅनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आता वाढत चालला आहे. तोच कल यंदाच्या दिवाळीत आणखी वाढल्याचे दिसत आहे.दर्जा उत्तम आणि मनाचे समाधानआॅनलाइन पद्धतीमुळे मोठयÞा प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. ५० ते ७५ टक्के सवलत असल्याने वस्तू कमीत कमी दरात मिळत आहेत. वस्तूंच्या दर्जामध्येदेखील कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे ही पद्धत उपयुक्त वाटत आहे.यावर्षी असे आहेत फटाकेपर्यावरण जागरूकता आणि ध्वनीप्रदुषणाबाबतची मर्यादा यांमुळे दणदणाट करणाºया सुतळी बॉम्ब, लवंगी फटाके यांना बाजूला सारून आकाश उजळवून टाकणाºया फटाक्यांची मागणी केली जात आहे.बेन्टेन, छोटा भीम, पॉवररेंजर्सलहान मुलांसाठी आकर्षण असणाºया बेन्टेन, छोटा भीम आणि पॉवररेंजर्स या कार्टूनमधील पात्रांच्या नावाने हे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. हे फटाके लावल्यानंतर साधारण १२ फूट ते १५ फूटवर जाऊन ते फुटतात.भुईचक्र‘म्युझकिल व्हील’ म्हणजेच ‘चकरी’ चा फटाका. ‘भुईचक्र’ या नावाने हा फटाका सर्वश्रुत आहे.त्यातून शिट्टीचा आवाज बाहेर पडतो.
दिवाळीनिमित्त खरेदीची धूम, आॅनलाइनवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:46 PM