शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

विक्रमगडचा ‘कलकत्ता झेंडू’ मुंबईच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:49 PM

दोन लाखांहून अधिक रोपांची लागवड : पडत्या काळातही शेतकऱ्यांना मिळतो ३५ रु पये किलोचा भाव

- राहुल वाडेकर

विक्रमगड : पावसाने दगा दिल्यामुळे गत मोसमात शेतकरी अगदी धायकुतीला आला होता. त्याचे परिणाम वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाड्यात आज ही दिसतात. मात्र, तालुक्यातील ओंदे गावातील प्रगतीशिल शेतकऱ्यांनी येथे अर्थजन्य देणारा कलकत्ता मोठा गोंडा असलेल्या झेंडुफुलाची तब्बल दोन लाखाहुन अधिक रोपांची लागवड करुन बिघडलेल्या अर्थचक्राला गती दिली आहे.

सध्या ओंदे गावातून जवळ जवळ तीन ते चार टन झेंडु काढला जात असुन तो दलालांच्या माध्यमातून थेट मुंबईतील दादरच्या बाजारपेठेत विक्र ीसाठी जात आहे. प्रथम सिजनमध्ये झेंडुला चांगला भाव मिळाला परंतु सद्यस्थितीत सणवार काही नसल्याने झेंडूचा भाव पडलेला आहे. तरी तो ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. हा भाव अर्धा असला तरी आपल्या पहिल्याच प्रयोगावर शेतकरी संजय सदानंद सांबरे समाधान व्यक्त केले.

विक्र मगड तालुका सुपिक जमिनीचा असल्याने पावसाळी भात लागवड तर उन्हांळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्र्षांपासुन फुलशेती या पिकाची लागवड शेतकरी हिवाळी व उन्हांळी हंगामात करीत आहेत. यावर्शी तालुक्यात हिवाळी हंगामात ३०० ते ३५० हेक्टरवर भाजीपाला त्याचबरोबर फुलशेतीचीही लागवड करण्यात आली आहे.ओंदे गावातील शेतकऱ्यांचा फुलशेतीचा पहिलाच प्रयोगओंदे गांवातील १५ ते २० शेतकºयांनी यंदा आपल्या शेतामध्ये ३० एकरमध्ये बहरदार कलकत्ता जातीच्या दोन लाखाहुन अधिक झेंडुची लागवड केली आहे. दररोज तीन ते चार टन झेंडू तोडला जातो व दलालांच्या माध्यमातुन तो थेट दादरच्या मार्केटमध्ये विक्र ीसाठी जात आहे. संजय सांबरे, निलेश पाटील, यशवंत बाबु पाटील, बबन काशिनाथ जाधव, भुपेंद्र सांबरे, योगेश पाटील, दिलीप खुताडे, अरु ण पाटील, हेंमत प्रमोद ठाकरे यांनी झेंडुची लागवड केली आहे.एकराला ५० हजार खर्च : झेंडूचे पीक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे आहे. या लागवडीकरीता बीयाणे, खत, मजुरी, ट्रक्टर असा मिळून जवळपास अर्धाएकरास ते एक एकरास ५० हजार रु पये खर्च येतो. लागवडीनंतर फक्त आठ दिवसांतून ऐकदा पाण्याची पाळी दयावी लागते. तर ऐकदा खत घालावे लागते. या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नाहीत.