बोईसर : दिवसेंदिवस सतत वाढणारी महागाई, हुकूमशाहीने लादण्यात येणारे वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी व अरवाना जेटी, बोईसरसह परिसरतील रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वेस्टेशनवरील पादचारी पूलाची मागणी, भारनियमन या विरोधात आज बोईसरला शिवसेनेतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला.हॉटेल मधुर ते स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्याचे नेतृत्व शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे, सह संपर्क प्रमुख केतन पाटील, आमदार अमित घोडा, माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ, तालुका प्रमुख सुधीर तामोरे, पं.स.च्या सभापती मनीषा पिंपळे, उप सभापती मेघन पाटील उप जिल्हा प्रमुख शिरीष चौहाण, माजी उपसभापती सचिन पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख परीक्षित पाटील, शिवसेना शहर प्रमुख नीलम संखे, वैभव संखे, जगदीश धोडी, विदुर पाटील, संजय ना पाटील, पं .स. सदस्य मुकेश पाटील व संतोष सावंत, तालुका उपप्रमुख गिरीश राऊत, सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपास्थित होतेमोर्चा स्टेशनवर आल्यानंतर मधील सेना पदाधिकारी आणि नेत्यांनी महागाई बरोबरच सरकारच्या जनता विरोधी धोरणावर टीका करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.या नंतर प्रशासकीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात इंधना वरील व्हॅट ५० टक्के कमी करणे, घरगुती गॅसचे भाव कमी करणे, जीवनावश्यक वस्तूंचे वाढत भाव नियंत्रणात आणणे, तसेच आवश्यक नसतांना महाराष्ट्रावर लादण्यात आलेली व न परवडणारी बुलेट ट्रेन रद्द करणे, बोईसर रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल पाडून नवीन बांधणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, भार नियमन रद्द करणे इत्यादी अनेक मागण्या केल्या आहेत. मोर्चात शहरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेचा महागाईविरोधात मोर्चा, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:44 AM