वसई : दहा वर्षाचा निषाद टँकरच्या अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला उपचार नाकारणा-या सर्वच हॉस्पीटलचे परवाने रद्द करा आणि महापालिकेच्या डॉक्टरांवरही कारवाई करा, अशी मागणी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.नालासोपाºयातील कीर्ती विद्यामंदिरमध्ये शिकत असलेल्या निषाद गोविंद घाडी या विद्यार्थ्याला पाच मिनिटे उशिर झाल्याने शाळेने वर्गात बसायला मनाई केली. त्यामुळे निषाद आपल्या वडिलांसोबत घरी परतत होता. वाटेत निषादचे वडील आपली दुचाकी गाडी रस्त्याकडेला ठेऊन निषादला गाडीजवळ ठेऊन दुकानात गेले होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने जोराची धडक दिल्याने निषाद गंभीर जखमी झाला होता.निषादवर उपचार करण्यासाठी त्याचे वडिल महापालिकेच्या रुग्णालयासह तीन खाजगी रुग्णालयात तब्बल साडे चार तास फिरत होते. मात्र, एकाही रुग्णालयाने त्याच्यावर उपचार केले नाहीत. त्यामुळे निषादचा त्याच दिवशी मृत्यू झाला. या घटनेनंतर वसई विरार परिसरात खाजगी हॉस्पीटलच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल घेत चौधरी यांनी आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आणला. अपघातानंतर उपचार नाकारणाºया वसई विरार महापालिकेचे डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी केली.
‘त्या’ हॉस्पीटल्सचे परवाने रद्द करा आणि महापालिका डॉक्टरांवरही कारवाई करा, सुदेश चौधरी यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:42 AM