- सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची आपापली चिन्हे असतात आणि ती मतदारांना ओळखीची असतात. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार वगळता प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला पक्षाचे निवडणूक चिन्ह दिले जाते. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एका पक्षाचे किंवा एका पॅनेलचे उमेदवार असले तरी त्यांना आपल्या प्रभागात वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० नवीन चिन्हांची भर पडली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असेल तर त्यांना निवडणूक चिन्हेही वेगवेगळी दिली जातात. निवडणूक आयोगाने या वर्षी एकूण १९० चिन्हे उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली होती. वसई तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. या चिन्हांमध्ये निवडणूक आयोगाने ४० नव्या चिन्हांची भर घातली आहे. त्यामध्ये संगणकाचा माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बिस्कीट, भाजीपाला आदी चिन्हांचा समावेश असल्याने आपल्याला आकर्षक चिन्ह मिळावे याकडे उमेदवारांचा कल असल्याचे दिसून आले.
या चिन्हांचा होता पर्यायn निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, nकंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, nफलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर.
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणारग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभागानुसार उमेदवार उभे असतात. एका प्रभागात दोन तर कधी तीन उमेदवार असतात. त्यामुळे एका पक्षाचे वा पॅनेलचे उमेदवार उभे राहिले तरी त्यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते. छत्री, शिटी, बॅट, गॅस, छताचा पंखा, चष्मा, बस आदी चिन्हांना पसंतीn या निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका असली तरी त्यांना अधिकृत चिन्हे वापरता येत नाहीत. निवडणूक आयोगाने नव्याने ४० चिन्हांचा समावेश केला असल्याने चिन्हांची संख्या १९० वर पोहचली आहे. n आकर्षक आणि मतदारांच्या लवकर पचनी पडतील, लक्षात राहतील अशा चिन्हांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित होणारी चिन्हे घेतली असून छत्री, शिटी, बॅट, गॅस, छताचा पंखा, चष्म्या, अंगठी, कंगवा, बस अशी ओळखीची चिन्ह वसईतील उमेदवारांनी घेतली आहेत. n या चिन्हांचा त्यांना किती फायदा होते हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे.