शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
2
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
3
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
4
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
5
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
6
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
7
माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी
8
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
9
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन
10
तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?
11
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."
14
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
15
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
16
काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'
17
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
18
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
20
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

शिक्षिकेने विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:59 PM

वसईच्या आश्रमातील घटना : गुन्हा दाखल 

नालासोपारा : वसई पूर्वेकडील फादरवाडी विभागातील एका आश्रमाच्या शिक्षिकेने सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही नालासोपारा पूर्वेकडील मदरशामधील मौलानाने १२ ते १४ विद्यार्थ्यांना चटके दिल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यामध्ये ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वसई पूर्वेकडील फादरवाडीमध्ये जीवनपुष्प नावाचा आश्रम आहे. या ठिकाणी विघ्नेश गणेश पवार (६) आणि त्याचा भाऊ शिक्षण घेत आहे. या आश्रमाच्या शिक्षिका ईजाबेल घोन्सालवीस यांनी शनिवारी दुपारी विघ्नेशच्या दोन्ही हातांना मेणबत्तीचे चटके देत अमानुषपणे वागणूक दिली. याबाबत त्याची आई सुनीता हिने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.व्यवस्थापनाची दादागिरी मुलाला चटके दिले म्हणून आईने तक्र ार केल्यानंतर हा राग मनात धरून आश्रमाने त्या पीडित विद्यार्थ्याला आश्रमातून काढून टाकले आहे. गरीब आणि हतबल आईने मुलाला सध्या मुंबईच्या दादर परिसरात ती घरकाम करीत असलेल्या मालकाच्या घरी नेऊन ठेवले आहे. पण मुलांना ठेवण्यात मोठी अडचण असल्याचे तिने ‘लोकमत’ला सांगितले.सदर आश्रमाच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिले म्हणून तक्र ार आणि फिर्याद आल्यावर आरोपीविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार