पालघर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही निवड केली आहे.अपंग मतदारांसाठी असलेल्या विशेष अॅपद्वारे नोंदणी केल्यास मतदान करताना त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून या कामी १८ वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. विश्वचषक विजेता कर्णधार विक्र ांत किणी यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून आपल्या सहभागाने मतदारांमध्ये मतदानाकरिता जागृती निर्माण होण्यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. याकरिता स्वीप अंतर्गत आपली डिस्ट्रिस्ट आयकॉन म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कर्णधार किणी यांना दिले आहे.मतदानासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात असून त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.एकूण २७६ मतदान केंद्रांत बदल करण्यात आला असून त्याची माहिती मतदारांपर्यंत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.एकूण २१९३ मतदान केंद्रेकेंद्र अधिकाºयामार्फत (बीएलओ) १७ आॅक्टोबरपर्यंत सर्व मतदारांपर्यंत मतदान पावती पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात एकूण २१२० मूळ आणि ७३ सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण २१९३ मतदान केंद्रे आहेत.
दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार बनले ‘विशेष मतदार जागृती दूत’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:55 PM