शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

कर्नाटकी फणस विक्रमगडच्या बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:06 PM

फणसाचे गरे १२० रूपये किलो : तरीही खवैैयांकडून मोठी मागणी, महाराष्ट्रातील फणस येण्यास लागणार अजून एक आठवडा

विक्रमगड : कोकणी मेवा म्हणजेच फणस विकण्यास काहीसा कालावधी बाकी असून अजून चांगला फसण तयार होण्यास व बाजारात विक्रीस आणण्यास किमान एक आठवडा काळ जाणार आहे. याचा फायदा उठवून कर्नाटकीय फणस बाजारात लवकर दाखल झालेले असून त्याचे आगमन विक्रमगडच्या आठवडा बाजारातत झाले व ग्राहकांनी खरेदीकरीता एकच गर्दी केली होती.

फणसाचा खरा उगम व जास्त उत्पादन हे कोकणात होते कोकणी मेवा म्हणजेच फणस तेथूनच फणस अनेकविध भागात विक्र ीस येत असतो. व आता तर कच्चा फणसापासून देखील विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जात असल्याने उपवासाला व इतर वेळेसही या वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. त्यामुळे सध्या फणाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेला आहे.परंतु अद्याप कोकणी फणस येण्यास आठवडयाचा कालावधी बाकी असल्यामुळे कोकणातील फणस अद्याप बाजारात दाखल झालेला नाही. त्याच बरोबर वातावरणात बदल झाल्याने आंबा, काजूवर जसा परिणाम झाला तसाच वातावरणाचा फणसांच्या उत्पादनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे यंदा कोकणातील मेव्याची आवक थोडयाफार प्रमाणात घटणारच आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन कर्नाटकीय फणस बाजारात एक आठवडा आधी दाखल झालेले आहेत. त्याचे आगमन विक्र मगडच्या आठवडा बाजारातत झाले व ग्राहकांनी खरेदीकरीता एकच गर्दी केली होती. फणस दिसला की प्रत्येकाला कोकणाची आठवण होते. कारण बाजारात येणारे बहुतेक फणस हे कोकणातलेच असतात. हे फणस जून च्या पहिल्या आठवडयापासून बाजारात दाखल होतात. मात्र विक्रमगड व परिसरातील बाजारपेठेत मे मध्ये गरे दिसू लागले आहेत. खाण्यासाठी गोड, व उन्हांत थंडावा देणारे असल्याने फणस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडत आहे. परंतु काही ग्राहकांनी सांगीतले की कोकणातील फणसाला जी गोडी व स्वाद, चव आहे तो या कर्नाटकीय फणसामध्ये तेवढया प्रमाणात दिसून येत नाही.

विक्रमगड तालुक्यातही आता मोठया प्रमाणावर फणसाचे उत्पादन घेत आहेत. एका झाडाला मोठया प्रमाणावर फणाचे फळ येत असल्याने पूर्ण सिझनमध्ये चांगल्या प्रकारे भाव मिळातो मात्र गावठी फणस हा कर्नाटकीय फणसापेक्षा जरा उशिराने बाजारात दाखल होतो. परंतु कर्नाटकीय फणसाच्या गोड सुगंधाने बाजारात घमघमाट पसरलेला आहे. वटपौैर्णिमेला महिलांना फणसाच्या ग-याची आवश्यकता असते म्हणून पुजेसाठी फणसाला मागणी मोठया प्रमाणात असते.

मात्र यंदा मे महिन्यात फणसाची आवक वाढली आहे हा फणस कर्नाटकातुनच येत असल्याचे येथे विक्रीकरण्यासाठी आलेल्या सुरेंद्रम या विक्रेत्यांनी सांगीतले. बाजारात सद्यस्थितीत फणसाचे गरे नविन असल्याने १२० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. एका फणसासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले. विक्र मगड आठवडा बाजारात सात ते आठ हात गाड्यावर हे फणसाचे गरे विक्री केले जात आहेत. बाजारपेठेत पुढे फणसाची आवक वाढल्यानंतर हेच गरे ५० ते ६० रु पये किलो दराने विकले जातात. असे विक्रेत्यानी सांगितले. कोकणाचा फणस येण्याच्या अगोदरच विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकीय फणसाने ग्राहकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे सध्यातरी ग्राहक महाग का होईना फणसाचे गरे मोठया आवडीने खरेदी करत आहेत. खवैैय्यांना खायला फणस लागतो महाराष्ट्रातला असो नाहीतर कर्नाटकातला त्यांना काही फरक पडत नाही.

सध्या कोंकणातील फणस येण्यास थोडा अवधी आहे. हे फणस आम्ही कर्नाटक राज्यातुन आणून विकतो. कोकणातील फणस येण्यास उशीर असल्याने सुरवातीलाच फणसाचा गराणा चांगला भाव मिळत आहे. कोंकणातील फणस बाजारात आला की फणसाच्या गराचे भाव कमी होतात. -इकबाल शहा, फणस विक्रेता

टॅग्स :Vasai Virarवसई विरार