शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

कर्नाटकी फणस बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:49 AM

फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकणी मेवा म्हणजेच फणस तो अनेकविध भागात विक्रीस’ येत असतो.

राहुल वाडेकरविक्रमगड : फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकणी मेवा म्हणजेच फणस तो अनेकविध भागात विक्रीस’ येत असतो. व आता तर कच्चा फणसापासून देखील विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जात असल्याने उपवासाला व इतर वेळेसही त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. त्यामुळे सध्या फणसाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेला आहे. परंतु अदयाप हे फणस बाजारात येण्यास १५ दिवसांचा कालावधी बाकी असून कर्नाटकी फणस सध्या येथील बाजारात दाखल झाला आहे. त्यावर खवैय्यांच्या उड्या पडत आहेत.त्याच बरोबर वातावरणात बदल झाल्याने आंबा, काजूवर जसा परिणाम होतो. तसाच तो फणसांच्या उत्पादनावर देखील होतो. त्यामुळे यंदा कोकणातील या मेव्याची आवक थोडयाफार प्रमाणात घटणारच आहे. हयाच गोष्टीचा व गावठी व कोकणातील फणस बाजारात जरा उशिरानेच येत असल्याचा फायदा घेऊन कर्नाटकी फणस बाजारात लवकर दाखल झालेले आहेत. फणस दिसला की प्रत्येकाला कोकणाची आठवण होते.कारण बाजारात येणारे बहुतेक फणस हे कोकणातलेच असतात.हे फणस मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून बाजारात दाखल होतात. मात्र विक्र मगड व परिसरातील बाजारपेठेत मे च्या सुरु वातीलाच फणासाचे गरे दिसू लागले आहेत. खाण्यासाठी गोड,व उन्हांत थंडावा देणारे असल्याने फणस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडत आहे.परंतु काही ग्राहकांनी सांगीतले की कोकणातील फणसाला जी गोडी व स्वाद, चव आहे तो हया कर्नाटकी फणसामध्ये तेवढया प्रमाणात नाही. विक्र मगड तालुक्यातही आता मोठया प्रमाणावर आदिवासीदेखील फणसांचे उत्पन्न घेत आहेत. एका झाडाला मोठया प्रमाणावर फळ येत असल्याने पूर्ण सिझनमध्ये चांगल्या प्रकारे अर्थाजन होते. मात्र कोकणतला फणस अजुन बाजारात येण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी जाणार आहे . कर्नाटकी फणसाच्या गोड सुगंधाने बाजारात घमघमाट पसरलेला आहे. वटपोर्णिमेला महिलांना फणसाच्या ग-याची आवश्यकता असते म्हणून पूजेसाठी फणसाला मागणी मोठया प्रमाणात असते. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच फणसाची आवक वाढली आहे हा फणस कर्नाटकातूनच येत असल्याचे सुरेंद्रम या विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात फणसाचे गरे नविन असल्याने १२० रुपये किलो या दराने विकले जात आहेत.एका फणसासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागतात असे त्यांनी सांगीतले. आठवडे बाजारात सात ते आठ हातगाड्यावर या फणसांच्या गरांची विक्री केली जात आहे. बाजारपेठेत पुढे फणसाची आवक वाढल्यानंतर हेच गरे ५० ते ६० रु पये किलोने विकले जातात. असे विक्र त्यानी सांगितले.त्यामुळे सध्यातरी ग्राहक महाग का होईना फणसाचे गरे मोठया आवडीने खरेदी करत आहेत. या कानडी फणसाने सध्यातरी येथील ग्राहकांवर मोहिनी घातली आहे.