पालघर : बांगलादेशातून आलेल्या २१ वर्षीय तरु णीला १ लाख रु पयात विक्री करून नंतर तिला जबरदस्तीने शरीरविक्रय करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी पती-पत्नी ला अटक केली असून अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बांगलादेशच्या मूळ रहिवासी असलेल्या मुबारक शेख (नाव बदललेले) ह्या २१ वर्षीय सुशिक्षित तरुणींनीचे लग्न एका शेतकºयांशी झाले होते. मात्र अधिक पैशाची हाव आणि मुंबईच्या झगमगाटाच्या आकर्षणाने आपल्या गावातील पण मुंबईत राहणाºया एक महिले सोबत तिने मुंबई गाठली. आणि त्या महिलेने तिची ओळख आरोपी अकबर सोबत करून दिली. त्याने मुबारकला दीपक व राजेश (पूर्ण नाव नाही) याना १ लाख रु पयाला विक्र ी केले. व त्यांनीही तिची फसवणूक करून पालघर मधील महावीर नगर येथे राहणाºया मोहमद सम्राट शादत शेख (२८) व त्याची पत्नी डॉली शेख यांना शरीरविक्रयासाठी ताब्यात दिले. मात्र, ५ सप्टेंबर रोजी तिने दोघांची नजर चुकवून पलायन केले व थेट पालघर स्टेशन गाठले. तेथून एक रिक्षावाल्याच्या मदतीने सरळ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. जे. रायपुरे ह्यांनी तात्काळ आरोपी पती-पत्नीला अटक केली.शीतपेय देऊन बळजबरीतिला मोहमदने आपल्या पालघर येथील घरी आणून शरीरविक्रय करण्यासाठी बळजबरी करु लागला. तिने त्यास विरोध केल्याने नारळ पाणी, शीतपेया मधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर मोहमदने शरीरसंबंध ठेवले. तू बांग्लादेशी असून पोलीस तुला पकडून नेतील अशी भिती त्यांने तिला घातली.
शरीरविक्रय व्यवसायात ढकलणा-यांना अटक, बांगलादेशी तरुणीचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:41 AM