नालासोपारा : शहराच्या पूर्वेकडील तिकीट खिडकीच्या बाजूला असलेल्या जाधव मार्केटला आग लागली नसून ती लावण्यात आली असल्याचे उघड झाल्याने नालासोपाऱ्यात खळबळ माजली आहे. मार्केटला आग लावणाºयाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर अनिता राजाराम जाधव (४०) यांनी गुरु वारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाºया अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वेकडील रेल्वे स्थानकालगत असलेल्या तिकीट खिडकीच्या बाजूला २ मे ला पहाटे साडे पाचच्या दरम्यान जाधव मार्केटला आग लागून ११ दुकाने जळून खाक झाल्याने लाखो रु पयांचे दुकानदारांचे नुकसान झाले आहे.
आता या जळीत कांडाला नाट्यमय वळण मिळाले असून दुकानांना आग लागली नसून लावण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. जाधव मार्केटच्यावतीने अनिता जाधव यांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस ठाण्यात तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे. सदर सीसीटीव्ही मध्ये एका अनोळखी तरु णाने एका दुकानाचे पत्रा बाजूला काढून त्यात आग लावली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.जाधव मार्केटबद्दल राजकारण करून आग लावण्यात आली आहे. याबद्दल सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यामागील मुख्य सुत्रधाराला पकडले पाहिजे. - अनिता जाधव, तक्रारदार
गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज दिल्यावर अनोळखी तरु णाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. - राजेश जाधव,पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे