बोईसर : गुन्हेगारी वर नियंत्रण मिळविण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी या करीता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभर सीसीटीव्हीचे जाळे विणण्याचा केलेला संकल्प व त्या दृष्टीने युद्धपातळीवर सुरू असलेले काम पाहता हेजाळे विणणारा पालघर जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा असेल असा आशावाद आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त जिल्ह्यामध्ये नागरी सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन तारापूर एमआयडीसी मधील टीमा सभागृहात करण्यात आले होते. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची गरज असल्याचे सवरा यांनी सांगून जिल्ह्याच्या पश्चिम पट्टीमध्ये आणि नालासोपारा भागात मोठी लोकवस्ती असल्याने नागरिकांनी दक्ष राहून पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.याप्रसंगी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अपर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण , भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव अर्चना वाणी, जि. प. सदस्या रंजना संखे, पं. स. सदस्य वीणा देशमुख व मुकेश पाटील, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरी जिल्ह्याच्या सर्व पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या महिला दक्षता समितीच्या सदस्या व पोलीस पाटील इत्यादी सह पोलीस उपविभागीय अधिकारी फत्तेसिंह पाटील आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.पोलीस पाटलांचे तोकडे सहकार्यप्रस्ताविकामध्ये अपर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांनी ७५ ते ८० टक्के पोलीस पाटील मदत करतात. बाकीच्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.कुठे काय घटना घडत आहे ते कंट्रोल रूममध्ये दिसेल विरार क्षेत्रात २१, नालासोपारा येथे ५०, तुळींज येथे १७ तर काही बोईसरला असे सीसीटीव्हीचे जाळे असणार आहे.२२ लाख लोकसंख्येला फक्त दोन हजार पोलीस असल्याने जिल्हातील सर्व प्रवेश द्वारांवर सीसीची नजर असणार आहे.
जिल्ह्यातील सीसीटीव्हीचे जाळे अव्वल ठरेल, पालकमंत्र्यांकडून माहिती, रेझिंग डे निमित्त नागरी सुरक्षा जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:55 AM