वसईत यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वालीव येथील द ग्रेट मराठा संस्थेनेही ती साजरी केली. वालीव नाका येथील छत्रपतींच्या पुतळ््याचे पूजन ज्येष्ठ नागरीक गोविंद धोंडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष जयेंद्र पाटील, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, सचिव नामदेव पाताडे, शंकर कदम, सोमनाथ लंगडे, रणधीर कांंबळे यावेळी उपस्थित होते.वसई विरार जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रदेश सचिव विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती साजरी करण्यात आली. अनिल रोकडे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजू गवाणकर, इंटकचे जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी, वसई खादी ग्रामोद्योगचे नारायण पाटील, सिल्वेस्टर परेरा, श्रृती हटकर, किरण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी हजर होते.नालासोपाºयात बहुजन विकास आघाडीच्यावतीने रक्तदान शिबीर, महिलांचा स्नेहमेळावा, हळदी कुंकू, मनोरंजनातून प्रबोधन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते सोहळ््याचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबीराची सुरुवात करण्यात आली.वसई विरार महापालिकेच्यावतीने विरार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिला बालकल्याण समिती सभापती भारती देशमुख, नगरसेविका कांता पाटील, सुरेखा कुरकुरे, कुमुदीनी चौधरी यांनी पंचारती ओवाळून महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले. राजीव पाटील, माजी नगरसेवक विलास चोरघे, नगरसेवक अजीव पाटील, सखाराम महाडिक यांनी महाराजांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण केले.तलासरीत रु ग्णांना फळवाटपतलासरी : शिवजयंती निमित्ताने सोमवारी वडवली येथील ग्रामीण रु ग्णालयात रूग्णांना मोफत फळे देण्यात आली. राजे छत्रपती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर पाटील, निलेश देशमुख, सुदर्शन वांगदरे, राहुल धनावडे, लक्ष्मण ननावरे, समीर कोंडे, प्रशांत शेळके, विष्णू भोसले, पांडुरंग ढाकरे, गणेश ढवळे, श्रीकृष्ण माटकर, सुशील घोरबांड यांनी महाराजांना एका वेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा केला. शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व राष्ट्राच्या जडघडणीत असलेली भूमिका समाजात पोहोचिवण्याचा मानस प्रतिष्ठानचे निलेश देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. अलोक विश्वकर्मा डॉ.सचिन घाटगे, डॉ.प्रसाद भारती, डॉ. खटाळ, शिवाजी घोडके, स्विटी संखे,एस. लोकरे उपस्थित होते.तलासरीत मिरवणूकतलासरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आमदार पास्कल धनारे याच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची पूजा झाली नंतर श्रीराम मंदिर पासून निघालेल्या मिरवणुकीत लेझीम पथक, तसेच मुलींचे तरपा नृत्य, व अश्वावर आरूढ झालेला शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील तरु ण हे लक्ष वेधून घेत होते.पालघर पालिकेतर्फे शिवरायांना अभिवादनपालघर : आज शिवजयंती निमित्ताने पालघर नगरपरिषदेच्या वतीने हुतात्मा स्तंभ आणि शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करून नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, उपनगराध्यक्ष रईस खान यांच्यासह नगरसेवकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
वसईत शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:48 AM