शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

वसईमध्ये चेन स्रॅचर्सची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:39 AM

नाकाबंदी व तपासणीसाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असतांनाही चेन स्नॅचिंग झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त के

वसई: गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी एका महिलेचे भर दिवसा चेन स्नॅचिंग करून माणिकपूर पोलिसांनी उत्सवकाळात उभारलेल्या सुरक्षा फळीला आव्हानच दिले आहे.नाकाबंदी व तपासणीसाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असतांनाही चेन स्नॅचिंग झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरु वारी दुपारी कौल सिटी मधील दोषी व अग्रवाल गृहसंकुल येथून आपल्या गोरेगाव येथील घरी परताना एक ५१ वर्षीय गृहिणीला रस्त्यावरून जात असताना मागून दुचाकीवर स्वार होऊन आलेल्या दोघा चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन जबरीने खेचून पोबारा केला.दरम्यान, घटना घडल्यावर त्या महिलेने आरडाओरड केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या मिहलेच्या मुद्देमालाची किंमत लाखोंच्या आसपास जात असून या चेन स्नॅचिंग मुळे ती प्रचंड दहशतीमध्ये आहे. या प्रकरणी पिडित महिलेच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी दोघा अज्ञातांवर विविध कलमानव्ये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्हा लागले आहे.गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचा संशयवरचेवर वसई- विरारच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असून ही बाब दिवसेंदिवस गंभीर बनताना दिसते आहे. छोट्या -माठ्या चोऱ्या, घरफाड्या, दरोडे, आत्महत्या, खून आदी गुन्हे व त्यातच दोन महिन्यापासून मुलामुलींचे बेपत्ता व अपहरण वाढले आहे.वसई, माणकिपूर ,नालासोपारा , वालिव, विरार आदी भागात असे चेन स्नॅचिंग चे प्रकार सतत डोकं वर काढत असल्याने वसई विरार भागात एकच चेन स्नॅचिंग करणारी टोळी कार्यरत असल्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारी