मनोर : टोलनाके बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत चक्काजामचा परिणाम ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. पाच दिवस उलटले तरी तोडगा निघत नसल्याने हातावर कमावणारे हजारो वाहतूक कामगार तसेच नागरिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता दिसत आहे.१ आॅक्टोबरपासून आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले असून पाच दिवस झाले तरी सरकारचा काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोर, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक कामगार, बिगारी, हमाल यांच्यासह सर्वसामान्य जनतेवर परिणाम होत आहे. तसेच तांदूळ, डाळ, साखर, गोडेतेल, गहू, ज्वारी इतर जीवनावश्यक वस्तूंची आवक कमी झाल्याने दरातही कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेले हॉटेल, गॅरेज, टायर्स दुकान, पेट्रोलपंप यांच्या व्यवसायावरही परिणाम झालेला दिसतो. (वार्ताहर)
चक्काजाम आंदोलनाचा फटका ग्रामीण भागालाही
By admin | Published: October 06, 2015 12:06 AM