जव्हार : येथील नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये मात्तब्बरांची टक्कर असल्याने कार्यकर्त्यांची मोठी पांगापांग झालेली दिसत आहे. अनेकांनी बाहरुन कार्यकर्त्यांची फौज बोलवल्याने त्यांची सरबराई सुरु असतांनाच इतरांनाही त्यात हात धुण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, जसजशी निवडणुकीचा दिवस जवळ येईल तसतसे मतदारांसाठी लक्ष्मी दर्शनाचा योग जुळन येणार आहे.ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने पैशाचा महापूर सुरु झाला असून तो रोखायचा कसा हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरचे मोठे आव्हान असून उमेदवारांना दिलेली आर्थिक खर्चाची मर्यादाही ओलांडली जाण्याची चिन्हे असून यामुळे मात्र येथील मतदारांची चंगळ होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या उमेदवारांची आर्थिक उधळपट्टी जोरात सुरु असून बॅनरबाजी, पत्रके याप्रमाणेच प्रभाग निहाय जेवणावळी , मद्याचा पुरवठाही सुरु झाला आहे.आठ हजारांच्या आसपास मतदान असलेल्या जव्हार नगरपरिषदेत एकूण मतदान सहा ते सात हजाराच्या आसपास होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. यामुळे चार पक्षाचे व एक अपक्ष अशा पाच उमेदवारामधून नगराध्यक्ष होण्यासाठी किमा दोनहजार ते अडीच हजार मते मिळविणे गरजेचे असून या कारणामुळे मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून हवी ती प्रलोभने दाखिवण्यात येत आहेत.अशावेळी बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते सोडले तर सर्व सामान्य मतदार हा लाभ सर्वांकडून घ्यायचा अन् मत ज्याला द्यायचे त्यालाच द्यायचे या भूमिकेत असल्याने त्यांची चंगळ होणार आहे. दरम्यान, एरवी दर्शन दुर्लभ असणाºया उमेदवार व पुढाºयांनी मतदार राजाला विनवण्या करायला सुरुवात केल्याने या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची देवघेव होण्याची शक्यता आहे.
मातब्बरांची टक्कर अन् मतदारांची चंगळ, निवडणूक निर्णय अधिका-यांपुढे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:30 AM