वजाबाकीच्या सिद्धान्तानुसार नोटाचे व्होट निकाल बदलणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:45 PM2019-04-23T22:45:06+5:302019-04-23T22:45:55+5:30

पालघर पोटनिवडणुकीचा परिपाठ; १६,८८४ मतदारांची नाराजी

The change in voting results according to subtraction theory | वजाबाकीच्या सिद्धान्तानुसार नोटाचे व्होट निकाल बदलणारे

वजाबाकीच्या सिद्धान्तानुसार नोटाचे व्होट निकाल बदलणारे

Next

डहाणू : खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनानंतर २०१८ मध्ये पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असा इतिहास असणाऱ्या भाजप व शिवसेनेमध्ये झालेल्या पोट निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना अनुक्रमे ३०.७६ व २७.४२ टक्के मते मिळाली होती. मात्र, यावेळी १६,८८४ मतदारांनी पोटाला पंसती दिली.

एकुण मतदानाच्या टक्केवारीमध्ये पोटाला १.९० मतदान झाल्याने हा आकडा विजयाचे संदर्भ बदलू शकला असता याचे ध्रोतक आहे. ही मते वनगा यांच्या पारड्यात पडली असती तर त्यांच्या मताचा आकडा २,६०,०९४ झाली असती. वजाबाकीच्या सिद्धांताचा विचार करता तेवढी मते विजयी उमेदवाराच्या खात्यातुन कमी केली असता निश्चितच विजयाचा संदर्भ बदलला असता. यामुळे विविध पक्षांकडून सध्या सुरु असलेल्या प्रचारात मतदारांना नोटा न दाबण्याचे आवाहन करुन मतदानाचा आकडा वाढवा असा ही प्रचार सुरु आहे. मतदाता मंच व अशा काही अंगिकृत संघटनांच्या माध्यमातून घरोघरी पत्रक वाटली जात असून मतदारांना मतदान करा असे आवाहन करतानाच नोटाच्या पर्यायाचा धोका सांगितला जात आहे. त्यामुळे पक्षांनी नोटाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

नोटाला व्होट देणारे किती?
उमेदवार पक्ष मते
राजेंद्र गावित भाजप २,७२,७८२
श्रीनिवास वनगा शिवसेना २,४३,२१०
बळीराम जाधव बविआ २,२२,८३८
किरण गहला सीपीआय ७१,८८७
दामोदर शिंगडा कॉँग्रेस ४७,७१४
नोटा १६,८८४

नोटा म्हणजे काय?
ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर इव्हीएम मशिनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.

05,15,992
मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या पोटनिवडणुकीत मिळाली होती. भाजपच्या गावित यांना 2,72,882 तर सेनेचे वनगा यांना 2,43,210 मते मिळाली होती.

Web Title: The change in voting results according to subtraction theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.