विक्रमगड : काही दिवसापूर्वी शिवसेनेचे शहापुर उपतालुका प्रमुख शैलेश निमसे यांना खून करून त्यांचा मृतुदेह अर्धवट जाळून जंगलात टाकण्यात आला होता. या खुनामागे विक्र मगड येथील जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचा हात असल्याची माहिती पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, चौकशी दरम्यान या घटनेशी सांबरे यांचा संबध नसल्याचे निष्पन्न झाले आहे.२० एप्रिल रोजी शैलेश निमसे यांचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत २४ एप्रिल रोजी प्रमोद लुटे (३२) रा. आसनगांव ता. शहापूर याला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने शैलेश निमसे यांचा खून केल्याची काबुली दिली.निमसे यांचा एका महिलेशी विवाहबाहय सबंध असल्याने त्याचा आणि त्याच्या पत्नीची नेहमी वाद होत असे. निमसे नेहमी आपल्या पत्नीस मारहाण करत तसेच तिला घटस्फोट देण्याच्या धमक्या देत असत. या मारहाणीला कंटाळून आणि घटस्फोट दिल्यास आपण संपत्तीमधून देखील बेदखल होऊ या भीतीपोटी तिने आपल्या ओळखीच्या प्रमोद लुटे यास पतीला मारण्याची सुपारी दिली. आणि त्यानी त्याच्या साथीदारांच्या मदतीने शैलेश निमसे यांचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बाबत लुटे आणि निमसे यांच्या पत्नीला गणेशपूरी पोलिसांनी अटक केली आहे. (अधिक वृत्त/२)जंगली महाराज ट्रस्टमुळे वाढला पेचकाही राजकीय पुढाऱ्यांनी या खुनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यापूर्वी शैलेश निमसे आणि ओम गुरु देव जंगली महाराज ट्रस्ट सोबत वाद झाले होते. तसेच शैलेश निमसे यांच्यावर खंडणीचा आरोप देखील झाला होता. या गोष्टीचा आधार घेत पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी ओम गुरुदेव जंगली महाराज ट्रस्ट, अघईचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांचे नाव देऊन त्यांना या खुनामध्ये गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सांबरेंनी केला. आत्ता पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खºया खुन्यांचा उलगडा झाला आहे. या तपासात पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे उत्तम पिंपळे आणि त्यांच्या पत्नीला सहआरोपी करावे अशी मागणी निलेश सांबरे यांनी केला आहे.निलेश सांबरे यांचे मी कुठेही नाव घेतलेले नाही. ते असे बेछुट आरोप का करीत आहेत हे त्यांनाच ठाऊक असेल. माझी त्यांची कुठेही स्पर्धा नाही आणि तपास कामात मी काय मदत केली आहे ते पोलिसांना ठाऊक आहे. त्यामुळे त्याचे आरोप बिनबुडाचे आहेत.- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष पालघर नगरपरिषद
निमसे खून प्रकरणात आरोप-प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:29 AM