कासा : डहाणू तालुक्यातील कैनाड या गावातील कुटुंब मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर २२ मार्च २०१४ रोजी वीटभट्टीवर जाण्यासाठी महामार्गावर खाजगी वाहनात बसून ती सुटण्याची वाट पाहत असताना चारोटी नाका येथे भरधाव वेगाने येणारा रसायनचा टैंकरचा ताबा सुटुन अपघात घडला होता. या घटनेमध्ये विस्फोट होऊन एकाच कुटुंबातील ६ जणांचा बळी गेला होता.यात सुनील उंबरसाडा, रीना उंबरसाडा, तेजस उंबरसाडा, पायल उंबरसाडा यांच्यासह अंजली बोबा , सीता बुंधाडा, याच्यासोबत इतर ४ असे एकूण १० बळी गेले होते. याबाबत कैनाड या गावातील कुटुबियांनी त्यांची व्यथा लोकमत समोर मांडली चार वर्ष होऊनही त्यांना कुठलीही मदत मिळाली नसल्याचे सांगताना वयोवृद्धाना अश्रु अनावर झाले होते. त्यांच्या घरातील कमवता हातच त्यांच्यात नसल्याने त्यांना आज इकडून तिकडून उसनवारी मागून आयुष्य जगावे लागत आहे.याबाबत पाठपुरावा करून सुद्धा मदत मिळालेली नाही. अंकिता व विघ्नेश यांचे पालकत्व हरवल्याने त्यांना शिक्षण तसेच उदरिनर्वाहासाठी दारोदार भटकावे लागत आहे. त्यांना आजतागायत मदत मिळालेली नाही.
चारोटी टँकर स्फोटातील मृतांचे कुटुंबीय चार वर्षांनतरही मदतीपासून उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:32 AM