शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून केली पोलिसांचीच फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 8:44 AM

दोघांना पोलिसांनी राजस्थानमधून केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : हॉटेल शोधण्यासाठी गूगलवर शोध घेताना ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून पोलिसांचीच फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या या दोन आरोपींना राजस्थानमधून मांडवी पोलिसांनी अटक केली. 

मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास हॉटेलबाबत गूगल सर्चवर शोध घेतला असता, व्हॉट्सॲपवर मोबाइल क्रमांक उपलब्ध झाला. त्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवला. त्या नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल करून हॉटेल बुकिंगकरिता दुसऱ्या एका मोबाईल नंबरवर ऑनलाइन पेमेंट पाठविण्यास सांगितले. फिर्यादींनी ऑनलाइन पेमेंट पाठविल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर फिर्यादीने व्हॉट्सॲप कॉन्फरन्स कॉल करून आरोपीने ऑनलाइन पेमेंट पोर्टलच्या माध्यमातून एकूण ८ ट्रान्झॅक्शनद्वारे ८८ हजार रुपये राजस्थानातील आरोपीने खात्यावर जमा करून आर्थिक फसवणूक केली होती. मांडवी पोलिसांनी २२ मे रोजी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली.

या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लक्ष्मणराज संजयसिंह झाला (वय २२) आणि सुभाष प्रभुलाल मकवाना (वय २१) यांचा सहभाग निष्पन्न होत असल्याने राजस्थानच्या बांसवाडा येथे पोलिस पथक पाठवून ताब्यात घेतले. त्यांना ५ ऑगस्टला अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी गुन्ह्याशिवाय इतर अनेक लोकांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.  

पोलिसांचे आवाहन आरोपीने अशा प्रकारे मोबाइल नंबर आणि बँक खाते वापरून फसवणूक केली असेल, तर मांडवी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. गुन्ह्यात अटक आरोपीची १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस