डहाणू : जम्मु कश्मीर येथील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात डहाणूतील दोन यात्रेकरू ठार तर ७ जण जखमी झाले होते. त्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना अमरनाथ यात्रा ट्रस्ट कडून मदतीच्या धनादेशाचे वाटप मंगळवारी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते देण्यात आले.अमरनाथ यात्रा ट्रस्ट कडून उषा मोहन सोनकर, निर्मला भरत ठाकूर यांच्या कुटुंबियांना ५ लाख तर जखिमंना ७५ हजाराची मदत यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी आंचल गोयल, तहसीलदार राहुल सारंग, भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाबजी काठोळे, उपध्यक्ष भरत राजपुत, रवींद्र फाटक, मिहिर शहा, अमित नहार यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मृत यात्रेकरूंना मृत्यू दाखल्याची अडचण सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करेल असे आश्चासन पालकमंत्री सवरा यांनी दिले. तर पीडीत अमरनाथ यात्रेकरूंना या पुढेही मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नात असल्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगीतले.
अमरनाथ पीडितांना धनादेश, आणखी मदत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 5:22 AM