- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमधील मुख्य रस्त्यावर लाखो लीटर अल्कलीयुक्त रासायनिक सांडपाणी पसरल्याने कामगार वर्गात घबराट पसरली आहे. हे सांडपाणी विराज प्रोफाईलचे असल्याचा आरोप असून रात्रंदिवस वाहणाºया या सांडपाण्याचे नमुने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी तपासणीसाठी घेतले आहेत.एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक जी १/२ व जी -२ या मधील विराज प्रोफाईल लि. या उद्योगाच्या बाहेरील पावसाळी गटारामध्ये कंपनीकडून रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष (पर्यावरण) प्रशांत संखे यांनी गुरुवारी करताच क्षेत्र अधिकारी अजित पाटील यांनी पंचनामा केला.जी प्लॉटमधील विराज प्रोफाईल लि. व सियाराम सिल्क मिल्स या दोन कंपनीच्या मध्ये असलेल्या भिंती बाहेरील गटार तुंबल्याने त्या मधून मोठया प्रमाणात अल्कलीयुक्त सांडपाणी बाहेर पडून ते रस्त्यावर वाहत असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे. त्या सांडपाण्याचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पी. एच. तपासला असता एका ठिकाणी ७ ते ८ तर तर दुसºया ठिकाणी ११ ते १२ आला आहे.ते सांडपाणी बºयाच दिवसांपासून अहोरात्र वाहत असूनही एमआयडीसी व एमपीसीबीच्या अधिकाºयांनी गंभीरतेने दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहेत.दरम्यान, ते अल्कलीयुक्त सांडपाणी प्यायल्याने पाच ते सहा कुत्रे मरण पावल्याले आहेत. त्यामुळे हे पाणी सजीवांसाठी जीवघेणे असल्याच्या समजूतीतून कामगार व रहिवासी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. एमआयडीसीमध्ये काम करणाºया हजारो कामगारांच्या त्वचा व आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.दोन्ही कंपन्याची कोलांटीउडी : वरील दोन्ही ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने पृथ्थ:करणासाठी घेण्यात आले आहेत. त्या वेळी विराज व सियाराम सिल्क मिल्स या दोन्ही उद्योगाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, दोन्ही कंपनीच्या अधिकाºयांनी ते सांडपाणी आमचे नसल्याचे सांगितले.मुख्य रस्त्यावर वाहणारे रासायनिक सांडपाणी हे विराज प्रोफाईल या कंपनीचेच आहे. त्याचा परिपूर्ण शोध एमपीसीबीच्या अधिकाºयांनी घेऊन दोषींवर कारवाई करावी.-प्रशांत संखे, पालघर तालुका अध्यक्ष,बविआ, पर्यावरणसांडपाण्याचे नमुने पृथ्थ:करणासाठी संकलित केले असून ते कुठल्या कंपनीचे आहे, याचा शोध घेण्यात येईल.मनीष होळकर, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर
एमआयडीसीच्या रस्त्यावर रासायनिक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:15 AM