पालघर: जिल्ह्यातील द-याखो-यात राहणा-या कातकरी समाजात प्रत्येक वर्षी कुपोषण, बालमृत्यू, गरोदर मातांच्या मृत्यू अशा घटना घडत असताना त्यावर ठोस उपाय योजना आखल्या जात नसल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री ह्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शूर झलकारी कातकरी एकता महासंघाच्यावतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मार्चाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यातील कातकरी समाजातील स्थलांतर ही मूळ समस्या असून ती थांबवून हाताला काम, पोटाला भाकरी उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, अनेक वेळा मागणी करूनही शासना कडून ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. कुपोषणामुळे गेल्या वर्षी मोखाडा खोच येथील सागर वाघ व ईश्वर सवरा ह्या दोन बालकांचा मृत्यू झाले. तर नुकताच १५ सप्टेंबर ला विश्वास सवरा ह्या कुपोषित बालकाच्या मृत्यूची नोंद झाली.पुरु षा मध्ये अशिक्षित पणा, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून गरोदर माता मृत्यू प्रमाण ही वाढीस लागल्याने आदिवासी समाजच संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप मोर्चेकºयांनी केला. त्यांच्या मृत्यू नंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे सह बरेच लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी या भागाला भेट दिली. ह्यावेळी घरकुले, रोजगार , कुपोषण, स्थलांतर थांबवू, तसेच आदिम समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना आखू व त्याची अंमलबजावणी करू अशी आश्वासने दिली होती. मात्र, ह्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याचे मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय संविधाना प्रमाणे कातकरी लोकांसाठी असलेल्या अधिकारापासून ह्या समाजाला वंचित ठेवले जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विष्णू सवरा, पंकजा मुंडे व आदिवासी विकास महामंडळ नाशिक चे अध्यक्ष ह्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत ह्या मागणीसाठी शेकडो मोर्चे कºयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले.यावेळी महासंघाचे अध्यक्ष रमेश सवरा, कार्याध्यक्ष शांताराम ठेमका, उपाध्यक्ष नारायण सवरा,रमेश भोये, लीला बोके, प्रमिला आरडी ह्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आपले निवेदन दिले.
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर गुन्हे नोंदवा; कुपोषण, बालमृत्यूचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:58 AM