- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे या हंगामातील चिकू उत्पादन कमालीचे घटले आहे. दरम्यान, बाजारात फळाला मागणी आणि दर चढा असतांना झाडावर फळच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.सध्या रमजान सुरू असून चिकूला मोठी मागणी आहे. प्रतवारीनुसार पहिल्या दर्जाच्या फळाला ४० रुपये प्रतिकिलो दर असून दुसºया आणि तिसºया दर्जाचे दर २० ते २५ आणि १० ते १५ एवढे आहेत. मात्र, झाडाला फळच नसल्याने शेतकºयांवर कठीण प्रसंग ओढाळवला आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. शिवाय सलग तीन ते चार दिवस आर्द्रता ही सव्वाशेच्या सुमारास होती. त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडण्यासह कळ्या आणि छोट्या फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे मे तसेच जून महिन्यात येणाºया उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास या हंगामात प्रतिदिन सुमारे १२५ ते १० टन माल (अंदाजे १२ ते १५ ट्रक) मालाची निर्यात होत होती. परंतु तालुक्यात साडेतीनहजार हेक्टर क्षेत्रावर चिकू असतांना या वेळी ही निर्यात जेमतेम ४५ ते ५० टन एवढीच आहे. काही बागायतींमध्ये तर झाडाला फळच नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादन संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी लोकमतला दिली.महिना बरकतीचा पण झाडांवर फळेच नाहीदरम्यान, या फळात प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने रमजान या उपवासाच्या काळात मुस्लिम धर्मियांकडून चिकूला अधिक पसंती दिली जाते. तथापी बाजारात मागणी जास्त आणि चढे दर असतात. त्यामुळे महागाईच्या काळातही उत्पादन खर्चाची सरासरी भरून निघण्यास हा महिना शेतकºयांकरिता लाभदायक ठरतो.या वेळी परिस्थिती विरोधाभास असल्याने त्याचा कोणताही लाभ यंदा बागायतदारांना होणार नाही अशी प्रामाणिक खंत बागायतदारांनी लोकमतकडे बोलून दाखवली व भरपाईची मागणीही केली आहे.
चिकूचे उत्पादन घटले , रमजानमध्ये मागणी वाढल्याने दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:59 AM