विरार : काही कारणास्तव घरात जन्मलेल्या बालकांसाठी महापालिकेने विशेष योजना हाती घेतली आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी विशेष सुविधा केंद्रे सुरु केली आहेत. घरात प्रसूत झाल्यामुळे बाळाचे नाव नोंदवताना पालकांना अनेक अडचणी येतात. प्रसुतीची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे महा पालिकेलाही अशा बाळाची नोंद करता येत नाही. घरीच प्रसूती झाल्यानंतर संबंधीत पालकांनी २१ दिवसांच्या आत त्याची खबर पालिकेला देणे आवश्यक आहे.त्यानंतर पुढील कारवाई पालिकेकडून विनामूल्य केली जाईल. खबर दिल्यानंतर महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील परिचारिका या प्रसूतीची माहिती गुप्तपणे गोळा करतात. या माहितीचा त्यानंतर पंचनामा तयार केला जातो. हा पंचनामा बाळाच्या पालकांना दिला जातो. त्याच्या आधारे त्यांना जन्माचा दाखला दिला जातो. (वार्ताहर)
घरी जन्मलेल्या बाळांची पालिका करणार नोंद
By admin | Published: July 03, 2016 3:01 AM