बोर्डी : घोलवड गावातील दिव्य दिपक राऊत हा तेरा वर्षीय विद्यार्थी सायकलवरून बुधवारी बोर्र्डी येथील शाळेत जात असता त्याला लोंबकळणा-या प्रवाहित वीज वाहिनीचा शॉक बसूनही त्याचे नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला.सकाळी सात वाजेच्या सुमारास घोलवड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूच्या अंतर्गत रस्त्याने तो बोर्डीतील शाळेत सायकलवरून निघाला होता. दरम्यान पाण्याच्या टाकीनजिकच्या वळणावर वादळी वाºयामुळे रस्त्याच्या मध्यभागी लोंबकळणाºया वीजवाहिन्या लांबून न दिसल्याने तो त्यांच्या संपर्कात आला शॉक लागून फेकला जाऊन बेशुद्ध झाला. नशिब बलवत्तर असल्याने जीव वाचला. सुमारे वीस मिनिटानंतर शुद्धीवर आल्यानंतर स्वत:च उठून त्याने घर गाठले. अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी त्याला तत्काळ घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर खेडकर आणि डॉक्टर वझे यांनी त्याच्यावर उपचार केले.हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतरही महावितरण कडून रस्त्याच्या मध्यभागी लोंबकळणाºया वाहिन्या त्वरीत बदलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी वाटसरू व वाहनचालकांना सूचित केले. अशा घटनांची महावितरणकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही.वर्षानुवर्षे जुने खांब व वीजवाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल वेळेवर होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या बाबत उपाय न योजल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. अपघातग्रस्त भाग महावितरणच्या कोसबाड उपकेंद्राअंतर्गत येतो. तेथील उप अभियंत्याशी अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलला नाही.वादळामुळे वीजवाहिन्या तुटून लोंबकळत असतात. या बाबत नागरिकांनी संबंधीत क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल.-भूपेंद्र धोडी, उपकार्यकारीअभियंता, डहाणू विभाग
घोलवड गावात वीजवाहिनीचा शॉक लागूनही बालक वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:51 AM