शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

मुलांना पोषण आहारच नाही

By admin | Published: August 06, 2015 11:27 PM

शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा

सुरेश काटे, तलासरीशाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी दोन महिन्यांपासून आहारापासून वंचित आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. तलासरी तालुक्याच्या पटसंख्येनुसार फेडरेशनकडे पोषण आहाराची मागणी केली जाते. इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १०० ग्रॅम तर इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १५० ग्रॅम असा पुरवठा होतो. यानुसार, तलासरी शिक्षण विभागाने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कन्झ्युमर फेडरेशनकडे तांदूळ १३००२२ किलो, मूगडाळ/मसूरडाळ ८६२५ किलो, तूरडाळ ८६२५ किलो, तेल ६५४६.५० किलो, मिरची १३४३ किलो, हरभरा-चवळी-मटकी ८६२५ किलो, मसाला १३४२.५० किलो, मीठ १३४३ किलो, जिरे ४३० किलो, मोहरी ४३० किलो, हळद ४३० किलो अशी मागणी जून, जुलै, आॅगस्टसाठी करण्यात आली. परंतु, १५ जूनला शाळा सुरू होऊन आज पावणे दोन महिने झाले, परंतु अजूनपर्यंत पोषण आहाराचा पुरवठा झाला नसताना अधिकारी अनभिज्ञ आहेत. गेल्या आर्थिक वर्षातही फेडरेशनकडून २८ हजार किलो तांदळाचा पुरवठा कमी करण्यात आला होता. तसेच तलासरी तालुक्याला या सामग्रीचा पुरवठा करणारा ठेकेदार त्याची काळ्याबाजारात विक्री करताना पकडण्यात आला होता. फेडरेशनकडून अनियमित पुरवठा करण्यात येत असल्याने आदिवासी विद्यार्थी वंचित राहत आहेत. परंतु, आर्थिक लागेबांधे असल्यामुळे फेडरेशनच्या पुरवठादारावर कारवाई करण्यात येत नाही. अच्छे दिनच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तरी यात लक्ष घालावे, अशी मागणी आदिवासी मुलांच्या पालकांनी केली आहे.