- हुसेन मेमनजव्हार - आदिवासी विकास प्रकल्पातील ६३ आदिवासी मुलांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर बनला होता. पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञा बोधिनी इंग्लिश मिडियम शाळेची मान्यता रद्द केल्यानंतर तेथे शिक्षण घेणाऱ्या या मुलांचे समायोजन आदिवासी विकास विभागाकडून कुठेच होत नसल्याने त्यांच्या पालकांना आपल्या मुलांसोबत उपोषण करावे लागले.त्यानंतर या मुलांचे समायोजन शहापूर तालुक्यातील आघई येथील आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये करण्यात आले असून गुरुवारी त्या शाळेची बस त्यांना शाळेत नेण्यासाठी आली होती. त्यावेळी आपले पाल्य शाळेत जाणार या भावनेमुळे अनेकांच्या कडा पाणावल्या होत्या.त्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि इतर वसतिगृहातील सवलती मिळत नव्हत्या. अशा अनेक कारणांमुळे चिखली येथील इंग्लिश मिडियम शाळेची मान्यता आदिवासी विकास विभागाने रद्द केली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या समायोजनाचा प्रश्न एैरणीवर आला होता. मात्र शाळा सुरु होवून तीन मिहने उलटले तरीही हा प्रश्न भिजत पडला होता.उपोषणाची वेळ आली हा प्रशासनाचा पराभवचत्या मुलांच्या पालकांनी प्रकल्प अधिकाºयांना अनेक वेळा भेटून निवेदन दिले होते. मात्र, मार्ग निघत नव्हता. त्या मुलांच्या पालकांनी याच मतदार संघातील राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना भेटून निवेदन दिल्यानंतरही त्या मुलांचे समायोजन कुठेच केले जात नव्हते. त्यामुळे त्या मुलांच्या पालकांना अखेर आपल्या मुलांसोबत घेवून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावालागला.त्यानंतर आदिवासी विकास विभागाला जाग येवून त्या मुलांना गुरु वारी दुपारी अघाई इंग्लिश मिडियम शाळेची बस येवून घेवून गेल्यानंतर त्या मुलांच्या पालकांना आनंद झाला. आदिवासी विकस विभागात सनदी अधिकारी असुनही पालकांना उपोषनाचा मार्ग अवलब्वावा लगत आहे. त्या पेक्षा विभागातील अधिकारी असते तर ही वेळ आली नसती असेही पालकांनी सागितले.
उपोषणकर्त्या पालकांची मुले निघाली शाळेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:17 AM