वसई : दहावे बालकुमार साहित्य संमेलन येत्या शुक्रवार आणि शनिवारी वसईतील वनमाळी संकुलात होणार आहे. किरण केंद्रे संमेलनाचे उद्घाटक असून दहावीची सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष असणार आहे. तर नववीच्या किशोरी मांडेकर आणि गायत्री घडवले सूत्रसंचालन करणार आहेत.शुक्रवारी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता किरण केंद्रे संमेलनाचे उद्घाटन करतील. प्रसिद्ध कवी व लेखक उत्तम कोळगावकर आणि प्रा. आत्माराम गोडबोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सहकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जोसेफ फरोज स्वागताध्यक्ष असतील.चित्रकार सुभाष गोंधळे व भागवत मुºहेकर अक्षर सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर करतील. दुपारच्या कथाबोध सत्रात लेखक व कादंबरीकार प्रसाद कुमठेकर कथाकथन करतील. आनंदी आनंद गडे या काव्यसंमेलनासाठी सुप्रसिद्ध कवी उत्तम कोळगावकर प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी विविध माध्यमांच्या शाळांमधील बहुभाषिक विद्यार्थ्यांचे काव्यवाचन होणार आहे.संध्याकाळी हे सुरांनो चंद्र व्हा ही सतीश पाटील यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या दिवसाचा शेवट दिग्दर्शक सदानंद दास यांच्या नाचू गाऊ बोलू विशेष कार्यक्रमाने होईल.चित्र आणि कलाप्रदर्शन हे विशेष आकर्षणदुसºया दिवशी शनिवारी दुपारी सुजाण पालक मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पालक आणि विद्यार्थ्याना समुपदेशक प्रा. प्रसन्न वरळीकर मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होईल. संमेलनात वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे अजय उसनकर, प्रा. दिगंबर गवळी, धनराज खाडे, वैभव ठाकूर, राधा गावडे आणि दत्तात्रय ठोंबरे यांचे चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. चित्रकार, शिल्पकार भीमाराव सोनवणे यांच्या काष्ठशिल्पांचे आणि जी. जे. वर्तक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
शुक्रवारी बाल साहित्य संमेलन; सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष, विद्यार्थींनीच करणार सूत्रसंचालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:44 AM