- आरिफ पटेलमनोर : पालघर तालुक्यातील केव येथील जि. प. मराठी शाळा व हायस्कूलच्या चिमुकल्यानी खाऊचे पैसे वाचवून ते शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या नॅशनल डिफेन्स फंडाला देणगी म्हणून दिले. त्यात तेथील ग्रामस्थ, शिक्षक व रिक्षा चालक व मालकांनीही आपले योगदान दिले. यातून ही १३,७०० रुपयांची रक्कम उभारण्यात आली.ती नॅशनल डिफेन्स फंडाच्या खात्यात जमा करण्यात आली. हा उपक्रम येथील माजी सैनिक सखाराम सोगले यांच्या कल्पनेतून साकारला. आपण आपल्या गावातून भारताच्या सीमचे रक्षण करणारे सैनिक, त्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आपण काही शी मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम साकारला. त्यात त्यांना गिरीधर पाटील , संतोष नाईक , जिजा पाटील, सुरेश शेलार, मोहन पाटील व इतरांची साथ लाभली.जि. प मराठी व हायस्कूल मध्ये गेले तेथिल विद्यार्थ्यांना आपल्या भारताचा नकाशा दाखवला त्यामध्ये सीमेवर आपले रक्षण करणारे सैनिक असतात त्यामध्ये काही सैनिक शत्रूंबरोबर लढत असताना शहीद होतात म्हणून आपल्याला त्यांच्या कुटुंबियांना, त्यांचे शाळकरी मुलांना मदत करायची आहे असे सांगितले. त्या वेळी मुलांनी ठरवले की, आज आपण आईस्क्र ीम किंवा चॉकलेट फरसाण न खाता ते पैसे शहीद कुटुंबियांसाठी देऊ त्या वेळी कोणी ? कोणी १० तर कोणी ५० रु पये त्या डब्यामध्ये टाकले. ग्रामस्थ, शिक्षक, रिक्षा चालक या सर्वांचे एकुण १३,७०० रु पये जमल्यावर ते नॅशनल डिफेन्स फंडात जमा केले. जि. प. मराठी शाळा केव येथील सिद्धांत पाटील, हार्दिक शेलार, सुगंधा रावते, गौरव गोवरी, नम्रता वेडगा, मंथन पवार, परीक्षित सातवी तसेच हायस्कूल चे निलेश जाधव, हार्दिक पवार, विवेक जाधव, आकाश गावित, कुर्तीम सासे, मनाली जाधव, सुहानी वाईडा, चैतन्य जाधव असे अनेक विद्यार्थ्यांनी खाऊ न खाता ते पैसे शहीद सैनिकांचे कुटुंबियांना दिले.तर जिजाताई पाटील म्हणाल्या की, सर्वांनी पुढे येऊन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे.माजी सैनिकांनी केले कौतुकसोगले म्हणाले की, मी स्वत: ज्या वेळी कार्यरत होतो त्या वेळी मला अनुभव आहे म्हणून मी संकल्पना राबविली. आमच्या गावातील लोकांनी साथ दिली याचे मला कौतुक वाटतोय. लहान मुलांनी खाऊ न खाता ते पैसे या फंडाला देऊन खारीचा वाटा उचलला. सुरेश शेलार म्हणाले की, आम्ही नशीबवान आहोत की, आम्हाला त्यांच्या कुटुंबियांना मदत करायची संधी मिळालीे.
खाऊच्या पैशांतून चिमुकल्यांनी नॅशनल डिफेन्स फंडाला केली १३,७०० ची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:55 PM