- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : मृग बहार २०१८ करिता हवामानावर आधारित चिकूला फळपीक विमा योजना लागू झाली आहे. या करिता सहभाग ऐच्छिक असून ३० जून रोजी बँकांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. पालघर जिल्ह्यात टाटा एआयजी इन्शुरन्स ही कंपनी ही योजना राबवत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तिचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी केले आहे.कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड आणि सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात चिकू फळासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाºया शेतकºयांसाहित इतर शेतकरी भाग घेऊ शकतात. पीक कर्ज घेणाºया शेतकºयांसाठी योजनेतील सहभाग बंधनकारक असून बिगर कर्जदारांकरिता सहभाग ऐच्छिक राहणार आहे.बिगर कर्जदार शेतकरी ३० जून पर्यन्त बँकेत विमा हप्ता जमा करून सहभागी होऊ शकतात. त्या करिता जमिनधारणा सातबारा, ८ अ उतारा आणि पीक लागवडीचा दाखला आदि कागदपत्र आवश्यक आहेत. हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के मर्यादेत राहणार आहे. या हून अधिकचा हप्ता केंद्र तसेच राज्य शासनाकडून अनुदान म्हणून थेट कंपनीकडे जमा करण्यात येतो.या विमा योजनेअंतर्गत धोक्याच्या ट्रीगर्स कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या सर्व शेतकºयास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. अल्प, अत्यल्प, भूधारक, मोठे शेतकरी या सर्व प्रकारच्या शेतकºयांकरिता सारखाच विमा हप्ता आहे. तो संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा कंपनीने नमूद केलेल्या वास्तवदर्शी विमा हप्ता या पैकी जो कमी असेल तो लागू राहणार आहे. यामुळे चिकू बागायतदारात सध्या अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.प्रतिहेक्टर विमा हप्ता २,७५० रु पये आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१८ या कलावधीत कमाल नुकसान भरपाई रक्कम प्रतिहेक्टर ५५ हजार आहे. या कालावधीत सापेक्ष आर्द्र्रता ९० टक्क्यांपेक्षा जास्त सलग पाच दिवस राहिल्यास २५ हजार नुकसान भरपाई देय असून सलग १० दिवस राहिल्यास ५५ हजार रु पये देय राहणार आहे.-आर. यू. ईभाड, कृषी अधिकारी, डहाणू
चिकूला फळ विमा लागू , हप्ता निर्धारीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:05 AM