सुरेश काटेतलासरी : पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपने कॉंग्रेस मधून आयात केलेल्या राजेंद्र गावितांना लोकसभेची उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत तलासरीत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी भोवणार आहे याचा फायदा मात्र कोणार होणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब शिवसेनेत गेल्या नंतर श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन भाजप वर मात केली त्या नंतर राजकीय उलाथापालात होऊन भाजपने गाविताना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली पण याच वेळी तलासरीच्या भाजप कोर कमिटीने एकमताने निर्णय घेऊन एकनिष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण वरखंडे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव घेतला या सभेला आमदार तथा जिल्हाधाक्ष पास्कल धनारे उपस्थित होते व त्यांनीही यास पाठिबा दिला परंतु भाजपच्या वरिष्ठ पातळीवर गावितांना उमेदवारीदेण्याचा निर्णय झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.अनेकांना दिवंगत चिंतामण वनगा यांनी उभे केलेले आहे या सर्वांच्या मनात गावितांच्या उमेदवारीने असंतोष खदखदत आहे.
तलासरीतील नाराजीचा गावितांना फटका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:29 AM