शशी करपेवसई : ख्रिस्ती धर्मगुरुंनी स्थापन केलेल्या बॅसीन कॅथॉलिक बँकेने एका ख्रिस्ती धर्मगुरुला बँकेचे सभासदत्व नाकारले आहे. मात्र, संघ परिवाराने स्थापन केलेल्या वसई जनता सहकारी बँकेने १९८८ साली फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना सभासदत्व दिल्याची माहिती लोकमतच्या हाती लागली आहे. त्यामुळे बँकेच्या निर्णयावर ख्रिस्ती समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.वयोमानानुसार निवृत्त झालेले फादर मायकल जी यांना बॅसीन कॅथॉलिक बँकेने सभासदत्व नाकारल्याची धक्कादायक माहिती लोकमतने उजेडात आणल्यानंतर वसईत खळबळ माजली आहे. त्यातच संघ परिवाराच्या वसई जनता सहकारी बँकेने १९८८ साली साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना भागधारक बनवून बँकेचे सभासद केले होते. या बँकेत फादर दिब्रिटो यांचे खातेही उघडण्यात आले होते.पालघर जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात ख्रिस्ती धर्मगुुरु आदिवासींचे धर्म परिवर्तन करीत असल्यावरून अनेक वेळा भाजपाविरुद्ध ख्रिस्ती धर्मगुरु असा संघर्ष झालेला आहे. असे असतानाही संघ परिवाराने स्थापन केलेल्या वसई विकास बँकेने ख्रिस्ती धर्मगुुरु फादर दिब्रिटो यांना १९८८ साली सभासदत्व दिले होते.दुसरीकडे, वसईतील एका ख्रिस्ती धर्मगुरुनेचे स्थापन केलेल्या बॅसीन कॅथॉलिक या बँकेने फादर मायकल जी यांचा सभासदत्वाचा अर्ज नाकारला आहे.याप्रकरणी बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी आता उघडपणे बोलायला तयार नाहीत.>धर्मगुरुंना लागते बिशप हाऊसची परवानगीधर्मगुरुंवर चर्चची बंधने असतात. धर्मगुरुंनी धार्मिक आणि आध्यात्मिक कामे करायची असतात. या पलिकडे काम करायचे असेल तर त्यांना बिशप हाऊसची परवागनी घ्यावी लागते. चर्चचे व्यासपीठ वापरून आर्थिक संस्थांमधील राजकारणात त्यांचा हस्तक्षेप होऊ यासाठी धर्मगुरुंना सभासदत्व देऊ नये असा अलिखित नियम बँकेने पहिल्यापासून अंमलात आणलेला आहे. धर्मगुरुंनीही ही पथ्ये पाळली आहेत. त्यामुळे हा वाद पहिल्यांदाच झाला, असल्याची माहिती बँकेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. मात्र, या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ़न ठोस भूमिका घेतली जाईल, असे एका ज्येष्ठ संचालकाने सांगितले.>सहकार क्षेत्रात कुठलाही दुजाभाव करता कामा नये असा कायदा आहे. बँक जातीधर्माचा विचार न करता वसईकरांच्या विकासासाठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करते. फादर दिब्रिटो यांच्याकडे बँकेचे खातेदार आणि सभासद म्हणून पाहिले जाते.-महेश देसाई, अध्यक्ष, वसई जनता सहकारी बँक
संघ परिवाराच्या बँकेचे ख्रिस्ती धर्मगुरुला सभासदत्व, ख्रिस्ती बॅँकेकडून मायकेल जींना नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:33 AM