हुसेन मेमन ।लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे कोरतड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ऐन पावसाळ्यात चार महिन्यांपासून बंद आहे. आजाराचे प्रमाण वाढलेल्या या परिसरातील रुग्णांवर त्यामुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. साध्यासाध्या उपचारांसाठी त्यांना महागड्या खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते आहे.या परिसरातील रु ग्णांना आरोग्य सुविधा व प्रथमोपचार तत्काळ मिळावेत म्हणून या आरोग्य उपकेंद्रात एका डॉक्टरांची व नर्स, शिपायाची निवासी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र ते थांबत नाहीत. परिणामी हे केंद्र असून नसल्यासारखे झाले आहे. त्याचा या परिसरातील रुग्णांना कोणताही उपयोग होत नाही असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.या उपकेंद्रांतर्गत ओझर, कुंडाचापाडा, मोठा मेढा, लहान मेढा, सावरपाडा, हंडीपाडा, कातकरीपाडा, तांबटीपाडा, पेरणआंबा, मोहुपाडा, गावठाण, पादवीपाडा, दिवापाडा, भोवरपाडा, रामनगर, असे गावपाडे येत आहेत. तसेच या कोरतड प्राथमिक उपकेंद्रा अंतर्गत पाच ग्रामपंचायतींचे गावपाडे येत आहेत. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना तत्काळ प्रथमोपचार मिळावे म्हणून हे आरोग्य उपकेंद सुरू करण्यात आले आहे.गावपाड्यावरील रुग्णांना त्यांचे नातेवाईक पायपीट करीत घेऊन सकाळीच घेऊन येतात. डॉक्टर आता येतील, मग येतील अशा आशेने पावसात भिजत, थंडीत कुडकुडत बसून राहतात. परंतु डॉक्टर सोडा, नर्सही इकडे फिरकत नाही. ते कधी येतील याची माहितीही इथे कोणी देत नाही. त्यामुळे त्यांना उपचाराविना परत फिरणे अथवा महागड्या रुग्णालयात उपचारासाठी धाव घेणे याशिवाय अन्य पर्याय उरत नाही.त्यामुळे रु ग्णांना प्रथमो उपचार मिळावेत म्हणून येथील ग्रामस्थांनी कोरतड ग्रामपंचायतीत ग्रामसभेत याबाबतचा मुद्दा उपस्थित करून येथे निवासी डॉक्टर, नर्स, सेवक नव्याने नियुक्त करावे अथवा नियुक्त आहेत त्यांना येथे निवासी रहाणे बंधनकारक करावे, असा ठराव मंजूर करण्यात आला.या परिसरातील होत असलेली रुग्णांची गैरसोय थांबविण्यासाठी चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्र व जव्हार तालुका आरोग्य केंद्राला यापूर्वी लेखी निवेदन दिले आहे. मात्र तरीही कोरतड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात अजूनही डॉक्ट व नर्स उपस्थित राहत नाही.पावसाळ्यात या परिसरात कावीळ, गॅस्ट्रो, टॉईफाईड, कॉलरा, डिसेंन्ट्री यासारखे साथीचे रोग पसरतात. त्याचप्रमाणे सर्पदंश , विंचूदंश, श्वानदंश याचेही प्रमाण खूप मोठे असते. त्यांच्यावर तातडीने उपचार न झाल्यास त्यांना मृत्युमुखी पडावे लागते.हे वास्तव ज्ञात असूनही याकडे आरोग्य खाते दुर्लक्ष करीत आहे. या परिसरात कुपोषणाचे प्रमाणही मोठे आहे. त्यात माता आणि बालक या दोघांचाही समावेश आहे. त्यांना उपचारासोबत पोषक आहाराचीही गरज असते. ते ही त्यांना यामुळे उपलब्ध होत नाही.अशा परिस्थितीत या उपकेंद्रासाठी नियुक्त केले डॉक्टर, नर्स, सेवक काय करतात, कुठे जाता त्यांचा पगार निघतो कसा, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आहेत. हे उपकेंद्र बंद असल्याने या परिसरातील रु ग्णांना प्रथमोपचार घेण्यासाठी १४ ते १६ कि.मी. चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. परंतु तिथेही उपचार तत्काळ न मिळाल्यास रु ग्णांना पुढील उपचारासाठी जव्हार रुग्णालयत धाव घ्यावी लागत आहे.काही रुग्णांना उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तातडीने लक्ष घालून हे उपकेंद्र सुरळीत सुरू न केल्यास तीव्रआंदोलन उभारण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी शासनाला दिला आहे.आमचे कोरतड उपप्राथमिक आरोग्य केंद गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील रु ग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे रु ग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. आम्ही अनेकदा ेकेलेल्या तक्र ारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता उग्र आंदोलन करण्याशिवाय अन्य पर्यायच उरलेला नाही.-परशुराम खुरकुटे,कोरतड ग्रामपंचायत सदस्यचालतवड प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया कोरतड आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर व नर्स यांची नेमणूक केली आहे. तरीही ते का बंद आहे याबाबत चौकशी करून सांगतो.-डॉ- किरण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी
कोरतड आरोग्य उपकेंद्र गेले चार महिने आहे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 3:01 AM