पालघर : सोमवारी या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणा विरूध्द कोण दंड थोपटणार याचाही फैैसला होणार आहे. या मतदारसंघात जरी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असते तरी त्यापैैकी प्रमुख उमेदवार रिंगणातच राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा, काँग्रेसतर्फे दामू शिंगडा, भाजपातर्फे राजेंद्र गावीत, बविआतर्फे बळीराम जाधव आणि डाव्या पक्षांतर्फे किरण गेहला असे उमेदवार रिंगणात आहेत. अन्य उमेदवार हे अपक्ष कि ंवा चिल्लर पक्षांचे आहेत त्यामुळे अंतीम लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव, गेहला यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत.डाव्या पक्षांचा उमेदवार या मतदारसंघात विजयी होत नसला तरी तो मोठी मते खाऊन जया पराजयाचे पारडे झुकविण्यास कारणीभूत ठरत असतो हा इतिहास आहे. हे ध्यानी घेता लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव अशी चौरंगी होण्याची शक्यता आहे.राष्टÑवादीने या निवडणूकीत उमेदवार उभा केलेला नाही तो काँग्रेसला पाठिंबा देईल अशीच शक्यता आहे. श्रमजीवीने आपली भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाही ती जाहीर झाल्यानंतर तिचाही परिणाम मतदानावर बऱ्याचअंशी होऊ शकतो. कडेगाव पलुसमध्ये आम्ही उमेदवार उभा केलेला नाही, हे लक्षात घ्या व पालघरमधून उमेदवार मागे घेऊन भंडारा गोंदियात पाठिंबा घ्या, असा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे. त्याचाही फैसला सोमवारी होण्याची शक्यता आहे.
चुरशीच्या लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:26 AM