पारोळ : चर्चला पक्षीय राजकारणात रस नाही. तसेच चर्च कुठल्याही एका राजकीय पक्षाचा पुरस्कार करीत नाही. सनद्शीर मार्गाने निवडून आलेल्या सरकारबद्दल कॅथोलिक चर्चमध्ये आदराची भावना जोपासली जाते. शासनाच्या सर्व न्याय कार्यक्रमांना चर्चचे नेहमीच सहकार्य लाभते, अशी भूमिका वसई ख्रिस्त धर्मसभेचे प्रवक्ते फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी जीवन दर्शन केंद्रातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केली आहे.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे नेते बिशप हाऊसला भेट देऊन आर्च बिशप फेलिक्स मच्याडो यांच्याशी संपर्क साधत आहेत.रविवारी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनीही येथे भेट दिली होती. चर्चची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू असून, या पाशर््वभूमीवर काढण्यात आलेले हे पत्रक या उमेदवारांची निराशा करणारे आहे. दर रविवारी ख्रिस्ती लोक प्रार्थनेसाठी जमतात त्यावेळी शासनकर्त्यांसाठी प्रार्थना केली जात. तसेच फादर्स, सिस्टर आपल्या रोजच्या प्रार्थनेत देशाच्या भल्यासाठी प्रार्थना करणे हा चर्चच्या धार्मिक कर्तव्याचा एक भाग आहे, असेही शेवटी म्हटले आहे.
चर्च कुठल्याही पक्षाचा पुरस्कार करीत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 3:50 AM